पॉवरप्लेमध्ये ज्याचा खेळ उत्तम त्याची सामन्यावर अधिक मजबूत पकड, असे क्रिकेटचे समीकरण आहे. त्यामुळे प्रत्येक संघ त्या सहा षटकात चांगली कामगिरी करण्यासाठी धडपडत असतो. अशातच डावाच्या सुरूवातीला गोलंदाजांने पहिल्याच षटकातच विकेट काढली तर अप्रतिमच. त्याचा प्रत्यय टी20 विश्वचषकात दिसून आला आहे, ते पण पाकिस्तानच्या एकाच गोलंदाजाकडून.
ऑस्ट्रेलियात पुरूष क्रिकेट संघाचा आठवा टी20 विश्वचषकाचा (T20 World Cup)अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान आणि इंग्लंड एकमेकांशी भिडले. हा सामना रविवारी (13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. यावेळी शान मसूद याच्या 38 धावांच्या जोरावर पाकिस्तानने 20 षटकात 8 विकेट्स गमावत 137 धावसंख्या उभारली. पाकिस्तानचे फलंदाज अपयशी ठरले असताना पुन्हा एकदा शाहीन शाह आफ्रिदी संघाच्या मदतीला धावला आणि लागोपाठ टी20 विश्वचषकाच्या बाद फेरीत विकेट घेण्याची कामगिरी केली.
टी20 विश्वचषकाआधी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) नुकताच फिट होईन संघात परतला. त्याच्याकडून उत्तम कामगिरी होणार की नाही अशी चर्चा सुरू असताना त्याने 2022च्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या पहिल्याच षटकात विकेट घेतली. त्याने सलामीवीर ऍलेक्स हेल्स (Alex Hales) याला षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्रिफळाचीत केले. हेल्स 2 चेंडूत 1 धावा करत तंबूत परतला. ही विकेट महत्वाची ठरली कारण त्याने उपांत्य फेरीत भारताविरुद्ध 47 चेंडूत नाबाद 86 धावा केल्या होत्या.
पाकिस्तानचा हा डाव्या हाताचा गोलंदाज आफ्रिदीने 2021च्या उपांत्य फेरीच्या पहिल्याच षटकात विकेट घेतली. या सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच याला तिसऱ्याच चेंडूवर शून्यावर बाद केले, मात्र हा सामना पाकिस्तानने गमावला. त्याने निराश न होता त्याने हीच लय कायम राखत 2022च्या उपांत्य फेरीच्या आणि अंतिम फेरीच्या पहिल्याच षटकात विकेट घेण्याची कामगिरी केली. first over wickets in t20 world cup knock-out matches
https://www.instagram.com/reel/Ck5a06ovftD/?utm_source=ig_web_copy_link
दोन्ही संघ एकदा तरी टी20 विश्वचषकाचे चॅम्पियन ठरले आहेत. पाकिस्तानने 2009मध्ये आणि इंग्लंडने 2010मध्ये विजेतेपद पटकावले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आदिल रशिदने बाबर आझमला कसे आपल्या जाळ्यात फसवले एकदा पाहाच, आयसीसीने शेयर केला व्हिडिओ
टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंनी दंडावर का बांधली काळी पट्टी? ‘हे’ आहे कारण