टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022मध्ये गुरूवारी (27 ऑक्टोबर) चकित करणारा निकाल पाहायला मिळाला. पर्थमध्ये चोविसावा सामना पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे (PAKvZIM) यांच्यात झाला. सुपर 12चा हा सामना झिम्बाब्वेने अवघ्या एक धावेने जिंकला. त्यामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या अडचणीत वाढ झाली तर विजयाने झिम्बाब्वेच्या संघात आनंदाची भर पडली आहे. खेळाडूंनी मैदानातच नाचत त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. झिम्बाब्वेच्या या जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सुरूवातीला पाकिस्तानचे या सामन्यात पारडे जड वाटत होते, मात्र यंदाचा झिम्बाब्वेचा संघ वेगळाच आहे. त्यातच अष्टपैलू सिकंदर रझा हा तर भन्नाट फॉर्ममध्ये आहे. त्याने 2013मध्ये आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याची कामगिरी पाहिली तर 2022मध्ये तो उत्तम ठरत आहे.
पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेने 8 विकेट्स गमावत 130 धावसंख्या उभारली. त्यांच्याकडून सीन विलियम्स याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 28 चेंडूत 31 धावा केल्या. यावेळी पुन्हा एकदा पाकिस्तानची गोलंदाजी उत्तम झाली. शादाब खान व मोहम्मद वसीम यांनी सहा चेंडूच्या अंतरात झिम्बाब्वेचे चार खेळाडू तंबूत पाठवत पाकिस्तानला पुन्हा सामन्यात आणले. मोहम्मद वसीम याने चार तर शादाबने 3 विकेट्स घेतल्या.
Celebrating yet another terrific performance! 🇿🇼#PAKvZIM | #T20WorldCup pic.twitter.com/0UUZTQ49eB
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) October 27, 2022
लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा धावा काढण्यात अपयशी ठरला. तो केवळ चार धावा काढून बाद झाला. मोहम्मद रिझवानही 14 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. भारताविरुद्ध आक्रमक अर्धशतक ठोकणारा इफ्तिखार अहमद 5 धावांवर बाद झाला. त्यानंतर शान मसूद व शादाब खान यांनी संघर्ष केला. मात्र, त्यानंतर झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी पाकिस्तानवर दबाव आणला.
सिकंदरने शादाब व हैदर यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करत पाकिस्तानला अडचणीत टाकले. मसूदही 44 धावा करत यष्टीचित झाला. अखेरच्या दोन षटकात 22 धावांची आवश्यकता असताना नवाझने षटकार मारत सामना समान स्थितीत आणला. अखेरच्या षटकात विजयासाठी 11 धावांची गरज असताना, इवान्स याने पहिल्या दोन चेंडूवर सात धावा येऊनही सामना झिम्बाब्वेला जिंकून दिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट कोहलीला मागे टाकत एका अनोख्या रेकॉर्डचा रझा झाला ‘सिकंदर’
‘हा’ अजब नियम तुम्हाला माहिती होता का?, दक्षिण आफ्रिकी संघाला मिळाल्या फुकटच्या पाच धावा