AUSvsPAK: क्रिकेट खेळात असे खूप कमी खेळाडू असतात, जे पदार्पणातच चमकदार कामगिरी करून जगाला आपली दखल घेण्यासाठी भाग पाडतात. यामध्ये पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज आमिर जमाल याच्या नावाचाही समावेश आहे. आमिरने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला घाम फोडला आहे. खरं तर, पाकिस्तान संघ 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. यातील पहिल्या कसोटी सामन्याला 14 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात पाकिस्तानी पठ्ठ्याने विकेट्सचा षटकार मारला आहे.
खरं तर, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी पहिल्या डावात 113.2 षटकात दहाच्या दहा विकेट्स गमावत 487 धावांचा डोंगर उभा केला. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर (David Warner) याने 164, तर मिचेल मार्श याने 90 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या डावात 10 पैकी 6 विकेट्स या एकट्या आमिर जमाल (Aamer Jamal) याने घेतल्या. त्याने 20.2 षटके गोलंदाजी करताना 111 धावा खर्च करत सर्वाधिक 6 विकेट्स आपल्या खात्यात जोडल्या. अशाप्रकारे तो पदार्पणाच्या कसोटीत 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतही सामील झाला.
पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्स गमावत 346 धावसंख्येवर खेळण्यास सुरुवात केली होती. यामध्ये त्यांनी आणखी 141 धावा जोडल्या. पहिल्या दिवशी नाबाद राहिलेला मिचेल मार्श आणि ऍलेक्स कॅरे यांनी धावफलक हलता ठेवला. कॅरे 34 धावा करत दुसऱ्या दिवशी बाद होणारा पहिला फलंदाज ठरला. त्याला आमिरने त्रिफळाचीत बाद केले. पाकिस्तानच्या या 27 वर्षीय गोलंदाजाने नंतर मिचेल स्टार्क, कर्णधार पॅट कमिन्स आणि नेथन लायन यांनाही बाद केले.
6️⃣ wickets for Aamir Jamal! Sixth-best bowling figures by a 🇵🇰 player on Test debut 👏
Australia are all out for 487 in their first innings 🏏#AUSvPAK pic.twitter.com/KQSTrfivpt
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 15, 2023
आमिरने त्याची पहिली विकेट मॅथ्यू हेड याच्या रूपात घेतली होती. त्याने हेडला 40 धावसंख्येवर असताना आगा सलमानच्या हातून झेलबाद केले. तसेच, दुसरी विकेट त्याने वॉर्नरला 164 धावसंख्येवर असताना इमाम उल हक याच्या हातून झेलबाद करत घेतली होती. आमिरचे हे प्रदर्शन पदार्पणाच्या कसोटीत पाकिस्तानकडून केलेले सहावे सर्वोत्तम प्रदर्शन ठरले.
पाकिस्तानकडून पदार्पणाच्या कसोटीत सर्वोत्तम प्रदर्शन वेगवान गोलंदाज मोहम्मद जाहिदच्या नावे आहे. त्याने 1996मध्ये न्यूझीलंडविरुद्ध रावळपिंडी कसोटीत 66 धावा खर्चून 7 विकेट्स घेतल्या होत्या. पाकिस्तानसाठी मोहम्मद नजीर, अबरार अहमद, बिलाल आसिफ, आरिफ बट आणि तन्वीर अहमद यांनी पदार्पणाच्या कसोटीत 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. (pak vs aus pacer aamer jamal performed brilliantly in his debut test took six wickets in the innings against australia)
हेही वाचा-
शॉट असा मारा की, काहीही होवो, पण सिक्स गेला पाहिजे! रसेलने धडपडत मारलेला षटकार पाहिला का? Video Viral
माजी दिग्गजाने सांगितली शुबमन गिलची मोठी कमजोरी; म्हणाला, ‘त्याने पॉवरप्लेमध्ये…’