पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये नुकतीच तीन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. यामध्ये ऑस्ट्रेलियाने तिसरी कसोटी ११५ धावांनी जिंकत मालिका १-० ने नावे केली. या दोन संघामध्ये खेळल्या गेलेल्या कराची आणि रावलपिंडी कसोटी अनिर्णीत राहिल्या होत्या. लाहोर कसोटीच्या दूसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला ३५१ धावांचे आव्हान दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ २३५ वर सर्वबाद झाला. यावेळी चहाच्या वेळेअगोदर बाबर आझम बाद झाला असता, परंतु त्याला जिवनदान मिळाले.
पाकिस्तानच्या दूसऱ्या डावाच्या ७६ व्या षटकात बाबर आझम (Babar Azam) ऑस्ट्रलियाचा फिरकी गोलंदाज लियाॅनच्या चेंडूवर झेलबाद झाला असता. तो चेंडू त्याच्या ग्लब्सला लागून स्लिपला उभ्या असलेल्या स्टिव्ह स्मिथकडे गेला. ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्टीव स्मिथने डाव्या बाजूला उडी मारत हा झेल घेतला. यावर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बाद झाल्याचे अपील दिले, परंतु पंचाने नाबाद दिले. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी डीआरएसची अपील केली आणि बाबरला जिवनदान मिळाले.
Thanks Umpire #AUSvsPAK
A spectacular catch from Smith at slip but Australia chose not to review it.#PAKvAUS pic.twitter.com/ktW8VB6mQ0— Arsalan Shahzad (@ArsalanShahzed) March 25, 2022
टीव्ही रिप्लेच्या अल्ट्रा-एजमध्ये समजले की, चेंडू फलंदाजाच्या ग्लब्सला लागून पुढे गेला होता. त्यामुळे बाबर आझम बाद झाला होता. परंतु ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅंट कमिन्सने डीआरएसचा निर्णय घेतला नाही, त्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार बाबर नाबाद राहिला. सोशल मिडीयावर या विषयावर चर्चा सुरू आहे.
A spectacular catch from Smith at slip but Australia chose not to review it.
Is that glove or is it pad? #PAKvAUS pic.twitter.com/ogMDePIzRH
— cricket.com.au (@cricketcomau) March 25, 2022
Off his bootlaces!
Steve Smith catches Pakistan captain Babar Azam! #PAKvAUS pic.twitter.com/afKe5O1g6l
— cricket.com.au (@cricketcomau) March 25, 2022
दरम्यान पॅंट कमिन्सने पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी केली आहे. त्याने पाकिस्तानच्या फवाद आलम आणि रिजवानला बाद केले. त्याने पहिल्या डावात ५ तर दूसऱ्या डावात ३ विकेट्स घेतल्या. तसेच नॅथन लियोनने दूसऱ्या डावात ५ विकेट्स घेतल्या.
शेवटच्या सत्राच्या सुरूवातीला लियोनने बाबरला बाद केले. बाबरचा झेल पुन्हा स्मिथनेच घेतला. पाकिस्तानी कर्णधाराने ५५ धावा करुन बाद झाला. तो मोठी खेळी खेळू शकला नाही. या दोन संघांमध्ये २९ मार्चला पहिला एकदिवसीय सामना तर ३१ मार्चला दूसरा एकदिवसीय सामना आणि २ एप्रिलला तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. तर ५ एप्रिलला एक टी२० सामना खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘थाला’प्रेम! चाहत्याने ओरडून म्हटले, ‘तूच सदैव राहशील माझा कर्णधार’; धोनीने असे केले रिऍक्ट
Photo: आयपीएल २०२२ आधी चेन्नईचा जुना शिलेदार डू प्लेसिसची धोनीशी गळाभेट, ‘माहीराट’चीही ग्रेटभेट
जडेजा का बनला चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार, ‘ही’ आहेत ५ महत्त्वाची कारणे