---Advertisement---

खेळपट्टी कोरडी करण्यासाठी पाकिस्तानने लढवली शक्कल! मैदानात बसवले भलेमोठे फॅन

---Advertisement---

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना गुरुवारपासून (24 ऑक्टोबर) रावळपिंडीत खेळवला जाणार आहे. यासाठी, खेळपट्टीच्या क्युरेटरने रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी तयार करण्यासाठी मोठ्या पंख्यांचा वापर केला आहे, जेणेकरून खेळपट्टी कोरडी होईल. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मजा घ्यायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानने मुलतानमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा 152 धावांनी पराभव केला होता. या विजयासह पाकिस्तानने 11 सामन्यांची कसोटी पराभवाची मालिका खंडित केली होती.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) दुसऱ्या कसोटी सामन्यात तीच खेळपट्टी वापरण्याचा निर्णय घेतला, ज्यावर पहिला कसोटी सामना खेळला गेला होता. या सामन्यात फिरकीपटू नोमान अली आणि साजिद खान यांनी मिळून नऊ विकेट घेतल्या, ज्यामुळे पाकिस्तान संघ तीन वर्षांनंतर पहिला कसोटी सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. अशा प्रकारे पाकिस्तानने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पुनरागमन केले. दोन्ही संघांमधील मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे.

कोरड्या खेळपट्टीवर मिळालेल्या यशानंतर पाकिस्तान तिसऱ्या आणि अंतिम कसोटीसाठी अशाच खेळपट्टीच्या शोधात आहे. यासाठी रावळपिंडी स्टेडियमचे पिच क्युरेटर खेळपट्टी कोरडी करण्यासाठी मोठमोठे पंखे वापरताना दिसले आहेत. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही सोशल मीडिया युजर्सने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची खिल्लीही उडवली आहे.

मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने पहिला विजय मिळाला
पाकिस्तानचा कसोटी कर्णधार शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला पहिला विजय मिळाला. यापूर्वी त्याच्या नेतृत्वाखाली संघ सलग सहा सामने हरला होता. मसूदने आपल्या कार्यकाळाची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 0-3 अशा पराभवाने केली. यानंतर घरच्या भूमीवर बांगलादेशविरुद्ध 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडविरुद्ध मुलतानमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीतही पाकिस्तानचा पराभव झाला होता. पहिल्या डावात 500 हून अधिक धावा करूनही पाकिस्तान हा सामना हरणारा पहिला संघ ठरला. मात्र, पहिल्या सामन्यानंतर पाकिस्तानने संघात मोठे बदल केले आणि दिग्गज खेळाडू बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांना उर्वरित दोन सामन्यांसाठी संघातून वगळले. याचा फायदा दुसऱ्या कसोटीत दिसून आला आणि संघाने पुनरागमन करत विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाचा उभरता सितारा! वेगवान गोलंदाज रसिक सलामने अवघ्या 5 चेंडूत घेतल्या 3 विकेट्स
“त्या दोघांना माझा तिरस्कार वाटायचा, कारण…”, स्टिव्ह स्मिथचे सहकारी खेळाडूंवर आरोप
WTC FINALच्या बाहेर पडले ‘हे’ 4 संघ! उर्वरित सामने जिंकूनही नाही फायदा?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---