सध्या क्रिकेटविश्वात कसोटी क्रिकेट (Test Cricket) याचे वारे जोरदार वाहत आहे. त्यात सर्व संघ चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये पाकिस्तान संघाने देखील त्यांचा खेळ अधिक उंचावण्याबाबत काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानचा संघ येत्या काही दिवसांत श्रीलंका संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. पाकिस्तान संघाने नुकतेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली आहे. यानंतर पाकिस्तानच्या खेळामध्ये कोणते बदल करावे लागतील याबद्दल कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने त्याचे मत व्यक्त केले आहे.
श्रीलंके विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बाबर म्हणाला, “आम्ही खेळत असलेल्या कसोटी क्रिकेटमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. जेव्हा विरोधी संघ मोठी धावसंख्या करतो तेव्हा फलंदाजांना ते लक्ष्य पार करणे अवघड जाते. सध्याची स्थिती काय असेल याची काळजी न करता आम्ही चांगला खेळ करण्याचा विचार करत होतो. मात्र काही वेळी सामना जिंकण्याच्या दिवशी एक वेगळी रणनीती आखावी लागते.”
“कसोटी क्रिकेटमध्ये परिस्थितीनुसार खेळ करावा लागतो. जेव्हा समोरचा संघ उत्तम खेळत करून तुमच्यावर जड पडत असेल तर तुम्ही तसा खेळ करणे महत्वाचे आहे,” असेही बाबर पुढे म्हणाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये पाकिस्तान संघाने संथ गतीने फलंदाजी केली होती. यामध्ये पाकिस्तानने एकाही डावामध्ये तीन किंवा त्यापेक्षा अधिक रनरेटने धावा केल्या नाही. बाकी संघांप्रमाणे पाकिस्तान संघालाही आक्रमकपणे खेळ करत जलद गतीने धावा करण्याची गरज आहे असे खुद्द कर्णधाराने मान्य केले आहे. बाबरने गोलंदाजांचे कौतुक केले आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत फिरकीपटूंंचा खेळ चमकदार झाला. श्रीलंकेतही फिरकीला अनुकूल खेळपट्टी असल्याने चांगलीच टक्कर मिळणार असल्याचे बाबरला माहीत आहे. यावरून तो म्हणाला, “ऑस्ट्रेलियाविरुद्ध आम्ही पूर्णपणे तयार होतो, तेथे आम्ही परिस्थितीनुसार खेळही केला आहे. आमच्याकडे खेळपट्टी आणि हवामानाला साजेशा खेळ करून त्याचा फायदा उठवण्यासाठी यासिर शाह, नौमान अली आणि मोहम्मद नवाज असे उत्तम फिरकीपटू आहेत.”
“श्रीलंकेच्या फलंदाजांना आमचे वेगवान गोलंदाज रोखून धरण्याची मला आशा आहे. श्रीलंकेचा संघ युवा असून त्यांना कमी लेखून चालणार नाही,” असेही बाबर म्हणाला आहे.
पाकिस्तान श्रीलंका दौऱ्यात एक सराव सामना आणि दोन कसोटी सामने खेळणार आहेत. यातील पहिला कसोटी सामना १६ जुलैला गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियवर आणि दुसरा कसोटी सामना २४ जुलैला आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारताने सामन्यात चमकदार कामगिरी केली’ माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी केली संघाची पाठराखण
पाचवी कसोटी जिंकण्यासाठी भारताला पाचव्या दिवशी ‘या’ पाच गोष्टी कराव्या लागतील, वाचा सविस्तर
पीसीबीचे अध्यक्ष झाल्यानंतर रमीझ राजांच्या जीवाला धोका? स्वत: उलघडली परिस्थिती