शुक्रवारी (१० जून) पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज संघात पुनर्नियोजित ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना मुल्तान येथे पार पडला. या सामन्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात बाबरकडे मोठा विक्रम रचण्याची संधी होती. मात्र, यामध्ये तो अपयशी ठरला. तो भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहील यांसारख्या दिग्गज फलंदाजांना मागे टाकू शकला असता. मात्र, त्याला यामध्ये अपयश आले.
सलग चौथे शतक करण्याची संधी हुकली
बाबर आझम (Babar Azam) याच्याकडे वनडे क्रिकेटमध्ये सलग चौथे शतक करण्याची सुवर्णसंधी होती. त्याने ३१ मार्च रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध लाहोर येथे ११४ धावांची खेळी केली होती. त्या मालिकेतील तिसऱ्या वनडेत बाबरने १०५ धावांची खेळी केली होती. तसेच, वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात त्याने १०३ धावांची खेळी केली होती. वनडेतील सलग ३ डावात शतक झळकावण्याची ही त्याची दुसरी वेळ होती. आता त्याच्याकडे चौथे शतक झळकावण्याची संधी होती. मात्र, ती संधी हुकली.
बाबरने चोपल्या ७७ धावा
वनडे क्रिकेटमध्ये सलग ४ डावांमध्ये शतक करण्याचा भलामोठा विक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा (Kumar Sangakkara) याच्या नावावर आहे. त्याने २०१५ विश्वचषकात ही कामगिरी केली होती. बाबरकडे त्याच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी होती. बाबरने चांगली सुरुवात केली. ६७ चेंडूत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे वनडे क्रिकेटमधील सहावे ५०हून अधिक धावांची खेळी होती. तो शतकाच्या दिशेने वेगान चालला होता. मात्र, ७७ धावांवर त्याला तंबूत परतावे लागले.
वेस्ट इंडिज संघाकडून ३६ वे षटक टाकत असलेल्या अकील होसेनच्या गोलंदाजीवर बाबरने लेग साईडला शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन गोलंदाजाच्या दिशेने गेला. यावेळी अकीलने सोपा झेल घेत त्याला तंबूत धाडले. त्यामुळे तो ९ फलंदाजांना मागे सोडण्यापासून मुकला. आतापर्यंत बाबरव्यतिरिक्त झहीर अब्बास, सईद अनवर, हर्षल गिब्स, एबी डिविलियर्स, क्विंटन डी कॉक, रॉस टेलर, जॉनी बेअरस्टो, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या खेळाडूंनीही सलग ३ वनडे शतके ठोकली आहेत. मात्र, बाबरला या खेळाडूंना मागे सोडण्यात यश आले नाही.
बाबरची वनडे कारकीर्द
बाबरने पाकिस्तानकडून आतापर्यंत ८८ वनडे सामने खेळले आहेत. यातील ८६ डावात फलंदाजी करताना त्याने ६०.०१च्या सरासरीने ४४४१ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने १७ शतके झळकावली आहेत. तसेच, १९ अर्धशतकेही केली आहेत. यादरम्यान १५८ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय सांगता! आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारा ‘हा’ दिग्गज खेळाडू करणार पुनरागमन?
इकडं भारत हारलाय अन् तरीही पाँटिंग म्हणतोय पंत आहे ‘खतरनाक’ खेळाडू, काय आहे कारण?
आयसीसीने बुमराहला घातलीय मानाची ‘टोपी’, पण का केला गेलाय ‘बूम बूम’चा सन्मान?