इमर्जिंग एशिया कप 2023 चा अंतिम सामना भारत अ आणि पाकिस्तान अ संघात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानच्या अनुभवी संघाने भारतीय संघावर एकतर्फी वर्चस्व गाजवताना 128 धावांनी दणदणीत विजय मिळवला. यासह पाकिस्तानने या स्पर्धेतील आपले विजेतेपद राखण्यात यश मिळवले.
अंतिम सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर सर्व गोष्टी पाकिस्तानच्या बाजूने घडल्या. सलामीवीर सईम आयुब व साहेबजादा फरहान यांनी वेगवान सुरुवात करताना पहिल्या गड्यासाठी 121 धावांची भागीदारी केली. यादरम्यान दोघांनी देखील अर्धशतके पूर्ण केली. भारतीय गोलंदाजांनी यातून सावरत उत्कृष्ट गोलंदाजी करताना पाकिस्तानला 5 बाद 187 अशा स्थितीत पोहोचवले. मात्र, त्यानंतर तय्यब ताहिरने केवळ 66 चेंडूंमध्ये शतक ठोकत पाकिस्तान संघाला 352 पर्यंत मजल मारून दिली. भारतीय संघाकडून राजवर्धन हंगरगेकर व रियान पराग यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघासाठी साई सुदर्शन व अभिषेक शर्मा यांनी वादळी सुरुवात केली. दोघांनी केवळ 8.3 षटकात 64 धावांची सलामी दिली. मात्र, आधी साई सुदर्शन व त्यानंतर निकिन जोस पंचांच्या चुकीच्या निर्णयाचे शिकार होत तंबूत परतले. अर्धशतक करून खेळणारा अभिषेक शर्मा देखील बाद झाल्याने भारतीय संघ अडचणीत सापडला. त्यावेळी कर्णधार यश धूल याने 39 धावांची खेळी केली. त्यानंतर भारताचे इतर फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्याने भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले. यास पाकिस्तानने सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा आपल्या नावे करण्याचा पराक्रम केला.
(Pakistan A Won Emerging Asia Cup 2023 Beat India A)
आणखी वाचा:
त्रिनिदादमध्ये सिराजचा कहर! पाच बळींनी यजमानांना 255 वर गुंडाळले, भारताकडे 183 धावांची आघाडी
सात्विक-चिरागचे कोरिया ओपनवर ‘राज’! पुरूष दुहेरीचे विजेतेपद केले नावे