---Advertisement---

पाकिस्तानच्या अष्टपैलू खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, एका वर्षात दुसऱ्यांदा घेतली निवृत्ती

On: शुक्रवार, डिसेंबर 13, 2024 4:54 PM
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या डावखुऱ्या फिरकी अष्टपैलू खेळाडूनं शुक्रवारी, 13 डिसेंबर सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली. इमाद वसीम 2024 टी20 विश्वचषकापासून पाकिस्तान संघाबाहेर होता. त्यानं गेल्या वर्षभरात दुसऱ्यांदा निवृत्ती जाहीर केली आहे. यापूर्वी तो नोव्हेंबर 2023 मध्ये निवृत्त झाला होता. परंतु या वर्षी तो टी20 विश्वचषकापूर्वी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला.

इमादनं आपल्या चाहत्यांना उद्देशून लिहिलेल्या संदेशात निवृत्तीची घोषणा केली. त्यानं लिहिलं की, खूप विचार केल्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. पाकिस्तानी संघाकडून खेळणं हा त्याच्यासाठी सर्वात सन्माननीय क्षण असल्याचं सांगताना इमाद म्हणाला की, संघाची जर्सी घालून मैदानावर येणं त्याच्यासाठी नेहमीच संस्मरणीय होतं. इमाद वसीम म्हणाला की तो देशांतर्गत आणि फ्रँचायझी क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे.

35 वर्षीय इमाद वसीमनं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये निवृत्ती जाहीर केली होती. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांच्या विनंतीनंतर तो मार्च 2024 मध्ये निवृत्तीतून परतला. त्यानं हा निर्णय जूनमध्ये झालेल्या टी20 विश्वचषकाच्या दृष्टीनं घेतला होता. त्याची विश्वचषक संघात निवडही झाली, परंतु तो तेथे विशेष काही करू शकला नाही. पुनरागमनानंतर त्यानं 9 सामने खेळले ज्यात त्याला केवळ 64 धावा आणि 8 विकेट घेता आल्या. तेव्हापासून तो संघाबाहेर आहे.

इमाद वसीमच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झाल्यास, त्यानं 2015 मध्ये पाकिस्तानसाठी पदार्पण केलं होतं. तेव्हापासून त्यानं संघासाठी 55 एकदिवसीय आणि 75 टी20 सामने खेळले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 42.87 ची सरासरी आणि 110.29 च्या स्ट्राईक रेटनं 986 धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्यानं 44 विकेटही घेतल्या. याशिवाय 75 टी20 सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून 554 धावा निघाल्या. टी20 मध्ये त्यानं 73 विकेट घेतल्या आहेत.

हेही वाचा – 

सूर्यकुमार यादवचं मोठं मन, रहाणेच्या शतकासाठी हा त्याग केला
पॅट कमिन्सचा भारतीय संघाला इशारा, गाबा कसोटीत ऑस्ट्रेलिया या घातक प्लॅनसह खेळणार
अजिंक्य रहाणेच्या झंझावातात हार्दिक पांड्याचा संघ उडाला! मुंबईची फायनलमध्ये धडक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---