रविवारी 8 जुलैला आॅस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तानमध्ये तिरंगी टी20 मालिकेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने 6 विकेट्सने विजय मिळवत मालिकाही जिंकली.
पाकिस्तानच्या संघासाठी जरी हा दिवस खास ठरला असला तरी मात्र त्यांचा साहिबजादा फरहान या नवख्या फलंदाजासाठी वैयक्तिक दृष्टीने हा सामना विस्मरणात जावा असा राहिला.
कारण फरहानचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता आणि त्यात तो त्याच्या पहिल्याच चेंडूवर यष्टीचीत झाला. त्यातही वाईट गोष्ट म्हणजे तो वाईड जाणाऱ्या चेंडूवर बाद झाल्याने त्याच्या नावावर एकही चेंडू न खेळता बाद झाल्याचा रेकॉर्ड लिहिला गेला.
असे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच झाले आहे. फरहानला आॅस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने बाद केले.
फरहानसाठी फलंदाजीत जरी चांगली कामगिरी करता आली नसली तरी त्याने क्षेत्ररक्षणात आॅस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांचे झेल घेत चांगले क्षेत्ररक्षण केले.
या सामन्यात आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 183 धावा केल्या होत्या. आॅस्ट्रेलियाकडून डॉर्सी शॉर्टने 73 धावा केल्या.
आॅस्ट्रेलियाने दिलेल्या 184 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग पाकिस्तानने 19.2 षटकातच यशस्वीरित्या पार केला. पाकिस्तानच्या विजयात फरहान सोबत सलामीला आलेल्या फखर जामानने 91 धावांची अर्धशतकी खेळी करत महत्त्वाची कामगिरी बजावली.
महत्त्वाच्या बातम्या:
-तिसरी टी२० गाजवलेले दोन भारतीय सेहवागकडून ट्रोल
-सचिन म्हटला १९व्या ओव्हरमध्येच टीम इंडिया जिंकणार आणि झालेही तसेच…
-रोहित शर्माचे नावही आता दिग्गजांच्या यादीत आदराने घेतले जाईल!