अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेतील हंबनटोटा येथे खेळला गेला. कमी धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात पाकिस्तान संघाच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करून दाखवली. केवळ 202 धावांचा बचाव करत असताना हारिस रौफ, नसीम शहा व शाहीन आफ्रिदी या वेगवान गोलंदाजांनी अफगाणिस्तानचा डाव केवळ 59 धावांवर गुंडाळत 142 धावांनी मोठा विजय साजरा केला.
Afghanistan are bowled out for their second-lowest score in ODIs as Pakistan take a 1-0 lead in the series 😯#AFGvPAK 📝: https://t.co/bmpFMRZFi4 pic.twitter.com/6AzCNh7ygm
— ICC (@ICC) August 22, 2023
त्रयस्थ ठिकाणी खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पाकिस्तान संघाला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाले. मात्र, पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली सलामीवीर फखर झमान व बाबर आझम हे अनुक्रमे 2 व 0 धावांवर माघारी परतले. इमाम उल हक व मोहम्मद रिझवान यांनी छोटेखानी भागीदारी केली. रिझवान 21 धावा करून बाद झाल्यानंतर इमाम याने सर्वाधिक 64 धावांची खेळी केली. इफ्तिखार अहमद 30 व शादाब खान 38 यांनी संघाला सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने नेले. अखेर नसीम शहा याने 18 धावा करत संघाला 200 ची मजल मारून दिली. अफगाणिस्तानसाठी मुजीब याने तीन तर राशिद व नबी यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
विजयासाठी मिळालेल्या 202 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा डाव शाहीन आफ्रिदी व नसीम शहा यांनी सुरुवातीपासूनच खराब केला. इब्राहिम, रहमत व शाहिदी या तिघांना खाते देखील खोलता आले नाही. केवळ चार धावांवर तीन गडी बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानचा डाव रुळावर आलाच नाही. सलामीवीर गुरबाझने सर्वाधिक 18 धावा केल्या. त्यांचा डाव केवळ 19.2 षटकात 59 धावांवर संपुष्टात आला. पाकिस्तानसाठी रौफ याने सर्वाधिक पाच बळी टिपले. त्यालाच सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
(Pakistan Beat Afghanistan By 142 Runs Harris Rauf Picks Fifer)
महत्वाच्या बातम्या-
“धोनीने रोहितला 2011 वर्ल्डकपसाठी डावललेले”, माजी निवडसमिती सदस्याचा धक्कादायक खुलासा
अल्टिमेट टेबल टेनिस लीगमध्ये जयपूर पॅट्रीओट्स या नव्या फ्रँचायझीची एन्ट्री