वेस्ट इंडिजचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असून उभय संघात ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (०८ जून) मुल्तान येथे खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिजकडून सलामीवीर शाय होपने शतकी तडाका देत संघाला मजबूत धावसंख्या उभारून दिली. परंतु प्रत्युत्तरात पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमनेही शतक केले आणि संघाला ४ चेंडू शिल्लक असतानाच ५ विकेट्सने सामना जिंकून दिला. यासह पाकिस्तानने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात (Pakistan vs West Indies) प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित ५० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर ३०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने ४९.२ षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर लक्ष्य पूर्ण केले आणि सामना खिशात घातला.
वेस्ट इंडिजच्या ३०६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून बाबर आझमने (Babar Azam) कर्णधार खेळी केली. १०७ चेंडूंचा सामना करताना ९ चौकारांच्या मदतीने त्याने १०३ धावा (Babar Azam Century) केल्या. हे त्याचे वनडे क्रिकेटमधील सलग तिसरे वनडे शतक ठरले आहे. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सलग २ शतके केली होती. आझमच्या साथीला सलामीवीर इमाम-उल-हकने ६५ धावा जोडल्या. तसेच यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवाननेही ५९ धावांचे योगदान दिले. तसेच खुशदिल शाहनेही २३ चेंडूत नाबाद ४१ धावांची झंझावाती खेळी खेळली.
या डावात अल्झारी जोसेफने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच जायडन शिल्स, रोमॅरिओ शेफर्ड आणि अकिल हुसैन यांनीही प्रत्येकी एका विकेटचे योगदान दिले.
💯 for Babar Azam and Shai Hope
2⃣ totals of 300+
1⃣ final over thrillerWatch a replay of the #PAKvWI ODI for FREE on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions): https://t.co/AO7oTb01bU pic.twitter.com/SiYihlzGwW
— ICC (@ICC) June 8, 2022
तत्पूर्वी वेस्ट इंडिजकडून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर शाय होपने (Shai Hope) सर्वाधिक धावा केल्या. त्याने १३४ चेंडूंचा सामना करताना १२७ धावांची जबरदस्त खेळी (Shai Hope Century) केली. या खेळीदरम्यान त्याने १ षटकार आणि १५ चौकार मारले. या खेळीसह त्याने अनेक विक्रमही केले. होपसह शामार्ह ब्रूक्स यानेही ७ चौकारांच्या मदतीने ७० धावांचे योगदान दिले. या दोघांव्यतिरिक्त वेस्ट इंडिजकडून कोणालाही मोठ्या खेळी करता आल्या नाहीत. कर्णधार निकोलस पूरनही २१ धावांची संघर्षमय खेळी करून बाद झाला.
या डावात पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज हॅरीस राऊफने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. १० षटके गोलंदाजी करताना ७७ धावा देत त्याने वेस्ट इंडिजच्या ४ फलंदाजाच्या विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजचा शतकवीर शाय होपलाही त्यानेच त्रिफळाचीत केले होते. तसेच शाहिन आफ्रिदीनेही २ विकेट्सचे योगदान दिले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेतून बाहेर पडल्याने केएल राहुलचे तुटले हृदय, केले इमोशनल ट्वीट
‘संजूला संघात आणा’, केएल राहुल बाहेर झाल्याने चाहत्यांकडून मागणीला जोर, ट्विट्सचा पाऊस