पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील शनिवारी खेळला गेलेला सामना रोमांचक होता. मात्र, पावसाने व्यत्यय आणल्यामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही. पण पांचांनी डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला 21 धावांनी विजयी घोषित केले. फखर जमान सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला, ज्याने संघासाठी तापडतोड खेळी करत शतक पूर्ण केले.
पाकिस्तानला या सामन्यात मिळालेला विजय अनेकांसाठी अश्चर्यचकित करणारा आहे. कारण प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने मोठी धावसंख्या केली होती. पण लाईव्ह सामन्यात आलेल्या पावसामुळे पाकिस्तानला फायदा मिळाला, असे अनेकांना वाटते. असे असले तरी, फखर जमान () याने वादळी खेळी नाकारता येत नाही. जमानने 63 चेंडूत शतक केले आणि सामन्याच्या शेवटी 126 धावांसर खेळपट्टीवर कायम होता. कर्णधार बाबर आझम यानेही 66* धावांची महत्वपूर्ण खेळी या सामन्यात केली.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्यात नाणेफेकीचा पाकिस्तानने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 401 धावा कुटल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने लक्ष्याचा पाठलाग करताना वेगवान सुरुवात केली. पावसाचे वातावरण असल्यामुळे पाकिस्तानी फलंदाजांनी आधीच धावगती जास्त राखली, ज्याचा फायदा त्यांना डकवर्थ लुईस म्हणजेच डीएलएस नियमानुसार पुढे झाला.
पहिल्यांदा पाऊस आला तेव्हा पाकिस्तानची धावसंख्या 1 विकेटच्या नुकसानावर 21.3 षटकात 160 होती. फखर जमान 106*, तर बाबर आझम 47* धावांसह खेळपट्टीवर होते. लक्ष्यापासून पाकिस्तान लांब असताना मैदानात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुढचा काही वेळ पावसामुळे खेळ थांबवला गेला आणि पंचांनी डकवर्थ लुईस नियमानुसार विजयासाठीचे लक्ष्य 342 धावापर्यंत कमी केले. यावेळी पाकिस्तानला विजयासाठी अजून 19.3 षटकात 182 धावा हव्या होत्या. खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर पाकिस्तानची धावसंख्या 200 पर्यंत गेली. बाबर आणि जमान खेळपट्टीवर कायम होते. पण पाऊस पुन्हा सुरू झाला. सायंकाळी 7.40 वाजेपर्यंत वाट पाहिल्यानंतरही पाऊश थांबला नसल्याने पंचांनी पाकिस्तान संघाला विजयी घोषित केले. बाबर आणि जमान मॅच विनर ठरले, पण सलामीवीर अब्दुल्लाह शफिक अवघ्या 4 धावांचे योगदान देऊ शकला.
तत्पूर्वी पहिल्या डावात न्यूझीलंडसाठी रचिन रविंद्र याने 94 चेंडूत 104 धावांची खेळी केली. पुनरागमनाच्या सामन्यात कर्णधार केन विलियम्सन यानेही 95 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. गोलंदाजी विभागात पाकिस्तानसाठी मोहम्मद वसीम याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच हसन अली, इफ्तिखार अहमद आणि हॅरिस रौफ यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. न्यूझीलंडला मिळालेली एक विकेट टिम साऊदी याने घेतली.
विश्वचषकाच्या गुणतालिकेचा विचार केला, तर पाकिस्तानच्या विजयाचा फायदा दक्षिण आफ्रिका संघाला मिळाला. उपांत्य फेरीतील दक्षिण आफ्रिकेचे स्थान न्यूझीलंडच्या पराभवानंतर निश्चित झाले. पाकिस्तानने पाचव्या क्रमांकावर झेप घेतली असून, न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर आहे. उपांत्य फेरीतील तीन आणि चार क्रमांकाच संघ बनण्यासाठी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. (Pakistan benefited from DLS rule, defeated New Zealand by 21 runs)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
न्यूझीलंड – डेवॉन कॉनवे, केन विलियम्सन (कर्णधार), रचिन रविंद्र, डेरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, जेम्स निशम, मिचेल सँटनर, टिम साउदी, ईश सोढी, ट्रेंट बोल्ट.
पाकिस्तान – अब्दुल्लाह शफीक, फखर जमान, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), इफ्तिखार अहमद, सौद शकील, हसन अली, मोहम्मद वसीम, उसामा मीर, शाहीन आफ्रीदी, हॅरिस रौफ.
महत्वाचाय् बातम्या –
‘एमसीए’ची वचनपूर्ती… प्रेक्षकांसाठी मोफत पार्किंगची सुविधा
७ नोव्हेंबर पासून रंगणार महाराष्ट्र केसरी स्पर्धा, महिंद्रा थार, ट्रॅक्टर सह विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट