वनडे विश्वचषक 2023 मध्ये मंगळवारी (31 ऑक्टोबर) पाकिस्तान आणि बांगलादेश हे संघ समोरासमोर आले. स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघांना या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना पाकिस्तान संघाने स्पर्धेतील आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी केली. शाहीन आफ्रिदी व मोहम्मद वसीम ज्युनियर यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवत, बांगलादेशचा डाव केवळ 204 धावांवर संपवला.
या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा हा निर्णय फसला. आफ्रिदी याने पहिले दोन धक्के दिल्यानंतर रौफने एक बळी मिळवत बांगलादेशची अवस्था तीन बाद 23 अशी केली. त्यानंतर महमदुल्ला व लिटन दास यांनी भागीदारी करत संघाला शंभरी पार करून दिली. महमदुल्लाहने अर्धशतक केल्यानंतर तो बाद झाला. तर दास व कर्णधार शाकिब यांनी उपयुक्त योगदान दिले. मोहम्मद वसीम याने तळाचे फलंदाज झटपट गुंडाळत बांगलादेशचा डाव 204 धावांवर संपवला.
(Pakistan Bowling Brilliant Against Bangaladesh Shaheen And Wasim Restirct Bangladesh On 204)
हेही वाचा-
भारताच्या माजी खेळाडूने गायले शाहीन आफ्रिदीचे गुणगान, इतर गोलंदाजांविषयी म्हणाला…
‘असे’ 5 खेळाडू, ज्यांच्याकडून वर्ल्डकपमध्ये कुणालाच नव्हती अपेक्षा, पण आपल्या प्रदर्शनाने करतायेत धमाल