सर्व क्रिकेटप्रेमी आशिया चषक 2023 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. या स्पर्धेची सुरुवात 30 ऑगस्ट रोजी पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील सामन्याने होणार आहे. पाकिस्तान संघ यावेळी या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. मात्र, केवळ 4 सामने त्यांच्या घरच्या मैदानावर खेळवले जातील, तर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत. या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचे त्याच्या संघाबाबत मोठे वक्तव्य समोर आले आहे.
आशिया चषकच्या तयारीसाठी पाकिस्तानचा संघ 22 ऑगस्टपासून श्रीलंकेत अफगानिस्तानविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी बाबर आझम (Babar Azam) याने पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांच्या संघातील खेळाडूंना यशाची भूक आहे आणि ते आगामी आशिया चषक आणि विश्वचषक विजेतेपद जिंकण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत.
बाबर माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “चांगली कामगिरी करण्यासोबतच संघातील प्रत्येक खेळाडूमध्ये यश मिळवण्याची भूक असते. प्रत्येक खेळाडू सामना जिंकण्यासाठी चांगली कामगिरी करण्याच्या भावनेत आहे. वेगवेगळ्या सामन्यांमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंनी सामनाविरचा पुरस्कार मिळवला आहे. आपण गेल्या काही सामन्यांमध्ये याची झलक पाहिली असेल. संघासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. गोलंदाजांनमुळे आम्ही खूप मोठे सामने विजयी झाले आहोत. मला माझ्या संघावर पूर्ण विश्वास आहे.” असेही बाबर म्हणाला.
आशिया कप आणि विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून तयारी करत आहे
अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेबाबत पाकिस्तानचा कर्णधार आझम म्हणाला की, “यावेळी आमचे लक्ष आशिया चषक आणि विश्वचषक या मोठ्या स्पर्धा लक्षात घेऊन तयारी करण्यावर आहे. परंतु, अशात आम्ही एकावेळी एकाच मालिकेवर लक्ष केंद्रित करू. कोणत्याही मोठ्या स्पर्धेपूर्वी अशा प्रकारची रणनीती करने ही संघासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे.
अफगानिस्थान आणि पाकिस्तान संघात रंगणार वनडे सामना
मंगळवारी (22 ऑगस्ट) ला अफगानिस्तान विरुद्ध पाकिस्तान या दोन संघात 3 सामन्याची वनडे मलिका खेळवली जाणार आहे. अशिया चषक 2023 आणि विश्वचषक 2023 च्या पार्शभूमीवर ही मालिका दोन्ही संघासाठी महत्वाची असणार आहे. (pakistan captain babar azam statment on his team before asia cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्मा आहे तिलकची सर्वात मोठी सपोर्ट सिस्टम! युवा फलंदाजाकडून मिळालेल्या मदतीचा खुलासा
बालुफ ऑटोमेशन चषक टेबल टेनिस स्पर्धा । नैशा रेवसकर व रुचिता दारवटकर, उपांत्यपूर्व फेरीत दाखल