यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक भालाफेक स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं (Arshad Nadeem) सुवर्णपदक जिंकलं. सुवर्णपदक जिंकल्यानंतर अर्शदचं खूप कौतुक होत आहे. सध्या पाकिस्तानात जल्लोषाचं वातावरण आहे. त्याचा परिणाम सोशल मीडियावरही दिसून आला. सुवर्ण जिंकल्याबद्दल पाकिस्तान कर्णधार बाबर आझमनं (Babar Azam) अर्शदचं अभिनंदन केलं. बाबरनं त्याचं खूप कौतुक देखील केलं. यासाठी त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. पण बाबरला ही पोस्ट शेअर करणं महागात पडलं.
तत्पूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघ बऱ्याच दिवसांपासून चांगली कामगिरी करु शकलेला नाही. 2023च्या एकदिवसीय विश्वचषकातून पाकिस्तान संघ बाहेर पडला होता. यानंतर 2024च्या टी20 विश्वचषकातही ते काही विशेष करु शकले नाही. त्यानंतर पाकिस्तान संघाला खूप ट्रोल करण्यात आलं. आता अर्शदनं पाकिस्तानसाठी सुवर्णपदक जिंकल्यावर चाहत्यांनी बाबरला निशान्यावर धरलं आहे. अर्शदचं कौतुक करण्यासाठी बाबरनं एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. यूजर्सनी या पोस्टवर अनेक कमेंट्स केल्या आहेत.
बाबरनं त्याच्या एक्स अकाउंटवर अर्शद नदीमचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “30 वर्षांनंतर पाकिस्तानात सुवर्णपदक परतलं आहे. या मोठ्या कामगिरीबद्दल अर्शद नदीमचे खूप खूप अभिनंदन. तुमचा संपूर्ण देशाला अभिमान वाटला आहे.” सोशल मीडिया यूजर्सनी बाबरचं त्याच्या पोस्टवर कौतुक केलं आहे. पण अनेक यूजर्सनी त्याला ट्रोल देखील केलं आहे.
After 30 long years, the gold is back in Pakistan! Huge congratulations to @arshadnadeem29 for this incredible achievement. You’ve made the entire nation proud. 🏅🇵🇰 pic.twitter.com/db7OmugQvE
— Babar Azam (@babarazam258) August 8, 2024
अर्शदनं भालाफेकमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकावला. त्यानं ऑलिम्पिक विक्रम केला. अर्शदनं 92.97 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला. त्यानंतर 88.72 मीटर, 79.40 मीटर, 84.87 मीटर आणि शेवटी 91.79 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला आणि सुवर्णपदकावर त्याचं नाव कोरलं. त्यानंतर नीरज चोप्रानं ऑलिम्पिक भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक मिळवलं. नीरजचे 6 पैकी 5 प्रयत्न फाऊल होते. पण त्याचा एकच प्रयत्न कामी आला. नीरजनं 89.45 मीटर अंतरापर्यंत भालाफेक करून रौप्यपदक जिंकलं. तर कांस्यपदक पीटर्स अँडरसननं पटकावलं.
महत्त्वाच्या बातम्या-
भाला कशापासून बनतो? भालाफेकीचा इतिहास काय? रंजक माहिती जाणून घ्या
विनेशसाठी धावून आला सचिन तेंडूलकर; गणित समजावत म्हणाला, “तिला रौप्य पदक…”
नीरज चोप्राच्या आईनं केलेल्या वक्तव्यावर कुस्तीपटू बजरंग पुनिया भावूक! म्हणाला…