---Advertisement---

बुडत्याला काडीचा आधार! भिकेला लागलेल्या पाकिस्तान क्रिकेटला ही कंपनी करणार मदत

---Advertisement---

मुंबई । पाकिस्तान क्रिकेट बोर्ड इंग्लंड दौऱ्यावर होणाऱ्या मालिकेपूर्वी राष्ट्रीय संघासाठी स्पॉन्सर शोधण्यात यशस्वी झाले आहेत. पीसीबीने खूप कमी पैशात कंपनीबरोबर करार केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पीसीबीने ट्रान्समीडियासोबत एक वर्षाचा करार केला आहे. ही कंपनी मागील काही वर्षापासून पीसीबीकडून प्रायोजकत्व आणि मीडिया अधिकार विकत घेतले आहे. 

ट्रान्स मीडिया कंपनी सहयोगी स्पॉन्सर मधून पीसीबीला वर्षांकाठी पंधरा कोटी रुपये देत आहे. ट्रान्समीडियाने पाकिस्तान संघाच्या जर्सी आणि किटवरील मुख्य लोगोसाठी तीन वर्षांच्या करारासाठी 60 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. अनेक प्रयत्नांनंतर पीसीबीला एक वर्षांच्या करारासाठी वीस कोटी रुपये मिळणार आहेत.

पीसीबी पुन्हा पुढच्या वर्षी लोगोसाठी लिलाव करू शकतो. यापूर्वी पेप्सी या कंपनीचा तीन वर्षांचा करार मागील महिन्यात संपला आहे. या कंपनीने पाकिस्तानला 91 कोटी रुपये दिले होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---