पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या सर्व काही ठीक चालले नाही. आधी त्यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका गमावली आणि आता जेसन गिलेस्पीला (Jason Gillespie) प्रशिक्षकपदावरून हटवण्यात येत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेदला (Aaqib Javed) सर्व फॉरमॅटचे मुख्य प्रशिक्षक बनवण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोने पाकिस्तानच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाबाबत एक रिपोर्ट सादर केला आहे. ज्यामध्ये जेसन गिलेस्पीच्या जागी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेदला पाकिस्तानच्या सर्व फॉरमॅटचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. गिलेस्पी सध्या पाकिस्तानचे कसोटी प्रशिक्षक असून ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरू असलेल्या मालिकेत पांढऱ्या चेंडूचा तात्पुरता प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे. रिपोर्टनुसार, गिलेस्पीला सर्व प्रशिक्षकपदाच्या जबाबदारीतून मुक्त केले जाईल.
आकिब जावेदची (Aaqib Javed) नुकतीच पाकिस्तान क्रिकेट निवड समितीच्या निमंत्रकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता तो पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्याच्या दिवशी सोमवारी आकिबला अधिकृतपणे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.
पीसीबीने याआधी जेसन गिलेस्पीला सर्व फॉरमॅटचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याचा विचार केला होता. पण नंतर त्याला व्हाईट बॉल प्रशिक्षकपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली, जी गिलेस्पीने नाकारली. यानंतर पीसीबीने गिलेस्पीला कसोटी प्रशिक्षकपदावरूनही हटवण्याचा निर्णय घेतला. गिलेस्पीच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानने नुकतीच इंग्लंडविरूद्धची कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली. तसेच 22 वर्षात ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिला मालिका विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
“मला ऑस्ट्रेलियात विराटचे कसोटी शतक पाहायचे आहे” ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य!
BGT; दुखापतीबद्दल केएल राहुलचे मोठे वक्तव्य म्हणाला, “पहिल्या कसोटीसाठी मी….”
हार्दिक पांड्याला पर्याय मिळाला! हा युवा अष्टपैलू खेळाडू करणार पहिल्या कसोटीत पदार्पण