आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं बीसीसीआयकडे एक अतिशय अनोखी मागणी केली आहे. वास्तविक, पीसीबीनं म्हटलं आहे की, बीसीसआयनं लेखी स्वरूपात द्यावं की भारत सरकारनं पाकिस्तानमध्ये खेळण्यास परवानगी दिली नाही.
सुरक्षेचे कारण सांगून भारत सरकारनं टीम इंडियाला पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याचे लेखी पुरावे बीसीसीआयनं द्यावेत, अशी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची इच्छा आहे. पीसीबीच्या एका सूत्राच्या हवाल्यानं ही बातमी आली आहे.
रिपोर्टमध्ये पुढे म्हटलं आहे की, पाकिस्तानला हा प्रश्न लवकरात लवकर सोडवायचा आहे. रिपोर्टनुसार, 19 जुलै रोजी कोलंबो येथे आयसीसीची वार्षिक परिषद होणार आहे, ज्यामध्ये स्पर्धेच्या ‘हायब्रीड मॉडेल’ बाबतची चर्चा अजेंड्यावर नाही. या नुसार भारतीय संघ युएईमध्ये आपले सामने खेळणार आहे.
रिपोर्टमध्ये पीसीबीच्या एका सूत्रानं म्हटलं आहे की, जर भारत सरकारनं परवानगी दिली नसेल तर तसं लिखित स्वरूपात द्यावं लागेल. बीसीसीआयनं ते पत्र आयसीसीला त्वरित द्यावं. आम्ही सातत्यानं म्हणत आहोत की, बीसीसीआयनं पाच-सहा महिने अगोदर या स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणाऱ्या भारतीय संघाबाबत आयसीसीला लेखी कळवावं.
बीसीसीआयनं सातत्यानं म्हटलं आहे की, पाकिस्तानमध्ये खेळण्याचा निर्णय सरकारचा असेल. 2023 आशिया चषकातही भारताचे सामने हायब्रिड मॉडेल अंतर्गत श्रीलंकेत खेळले गेले होते. पीसीबीनं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाचा मसुदा आयसीसीकडे सादर केला आहे, ज्यामध्ये भारताचे सर्व सामने, उपांत्य फेरी आणि अंतिम सामने लाहोरमध्ये होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 1 मार्चला होणार आहे.
2023 आशिया चषकाचं यजमानपदही पाकिस्तानकडे होतं. मात्र टीम इंडियानं पाकिस्तानात जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवण्यात आली. भारतीय संघानं आपले सामने श्रीलंकेत खेळले होते. आतापर्यंत बीसीसीआयनं 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत कोणतंही अधिकृत विधान जारी केलेलं नाही. मात्र, भारतीय क्रिकेट बोर्डानं आयसीसीकडे हायब्रीड मॉडेलची मागणी केल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
डेव्हिड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार का? निवडकर्त्यांनी घेतला मोठा निर्णय
‘हिटमॅन’च्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी! टी20 नंतर रोहित वनडे आणि कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्त होणार?
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बीसीसीआयला धमकी! “भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी आला नाही तर…”