बुधवारी (9 नोव्हेंबर) सिडनी येथे न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (New Zealand vs Pakistan) संघात टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तान संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तान संघ तिसऱ्यांदा टी20 विश्वचषकाची अंतिम फेरी खेळेल. पाकिस्तानने आपला पहिला वनडे विश्वचषक 1992 मध्ये जिंकलेल्या. त्यावेळी घडलेले असेच काही योगायोग या विश्वचषकात दिसून येत आहेत.
या विश्वचषकातून पाकिस्तान संघ एकवेळ स्पर्धेतून बाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर होता. त्यांना भारत व झिम्बाब्वेने पराभूत केलेले. मात्र, त्यानंतर सर्व गोष्टी पाकिस्तानच्या बाजूने घडत गेल्या व त्यांनी उपांत्य फेरीत मजल मारली. आता उपांत्य फेरी जिंकत ते विश्वचषकाची अंतिम फेरी खेळतील. तीस वर्षांपूर्वी अशाच प्रकारे पाकिस्तान थोडी मेहनत व थोडी नशिबाच्या जोरावर विश्वविजेता झाला होता.
सन 1992 मधील विश्वचषक हा देखील ऑस्ट्रेलियात आयोजित केला गेला होता. त्यावेळी पाकिस्तानला साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने, तर यावेळी भारताने पराभूत केले होते. विशेष म्हणजे हे दोन्ही सामने मेलबर्न येथील एमसीजीवर खेळले गेलेले. या दोन्ही वेळी साखळी फेरीत पाकिस्तानला भारताकडून पराभूत व्हावे लागलेले.
या दोन्ही विश्वचषकातील आणखी एक योगायोग म्हणजे यजमान ऑस्ट्रेलिया दोन्ही वेळी साखळी फेरीच्या पुढे जाऊ शकला नाही. तसेच या दोन्ही वेळी पाकिस्तानी आपले अखेरचे तीनही साखळी सामने जिंकले होते. तर, बाद फेरीसाठी पात्र होण्याकरिता त्यांनी दोन्ही वेळी आपल्यापेक्षा खालच्या क्रमांकावर असलेल्या संघापेक्षा केवळ एक गुण जास्त घेतला. याव्यतिरिक्त, उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांनी न्यूझीलंडला धावांचा पाठलाग करत असतानाच पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे.
हे सर्व योगायोग पाहता पाकिस्तान संघ आपले दुसरे टी20 विश्वचषक विजेतेपद पटकावणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. (Pakistan Cricket Team Coincidance From 1992 ODI World Cup And 2022 T20 World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्रर्र! पंचांनी एकाच फलंदाजाला 2 चेंडूंवर दोन वेळा दिले आऊट, पण असं घडलं तरी कसं?
पाकिस्तान फायनलमध्ये! न्यूझीलंडच्या विश्वविजयाच्या स्वप्नांचा पुन्हा चुराडा






