सर्व क्रिकेटप्रेमी आशिया चषक 2023 स्पर्धा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याआधी बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाला वनडे क्रिकेट प्रकारात क्रमवारीत नंबर-1 स्थान मिळवण्याची मोठी संधी आहे. सध्या ऑस्ट्रेलियन संघ 118 रेटिंग गुणांसह आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा संघ 116 रेटिंग गुणांसह दुसऱ्या तर भारतीय संघ 115 रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पाकिस्तान संघाला आशिया चषकापूर्वी श्रीलंकेत 22 ऑगस्टपासून अफगाणिस्तानविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. यामध्ये पहिले 2 सामने हंबनटोटा येथे तर शेवटचा सामना 26 ऑगस्ट रोजी कोलंबोतील आर प्रेमदासा मैदानावर खेळवला जाईल. जर पाकिस्तान संघ या मालिकेत सर्व सामने जिंतकण्यात यशस्वी ठरला तर त्याला 119 रेटिंग गुण मिळतील. असे झाल्यास पाकिस्तान संघ वनडे क्रमवारीत प्रथम क्रमांकावर पोहचेल.
अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानने एकही सामना गमावला तर ते दुसरे स्थानही गमवतील. मालिकेचा निकाल 2-1 असा जर लागला तर पाकिस्तान संघ क्रमवारीत भारताच्या खाली तिसऱ्या स्थानावर जाईल आणि भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर येईल. सध्या अव्वल स्थानी असलेला ऑस्ट्रेलियन संघ हा घसरत घेऊन दुसऱ्या क्रमांकावर येईल. मात्र, हे काम अफगाणिस्तानसाठी सोपे जाणार नाही. पाकिस्तान या मालिकेतील सर्व सामने जिंकून आयसीसी वनडेच्या क्रमवारीत अव्वल स्थानी येणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल.
भारत 2 सप्टेंबरला आशिया चषक स्पर्धेत भाग घेणार आहे
30 ऑगस्टपासून सुरू होणारा आशिया चषक प्रथमच हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवला जात आहे. यामध्ये सुरवातीचे सामने पाकिस्तानात तर बाकीचे सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत आणि या दोन्ही संघांमधील सामना 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियमवर होणार आहे. (pakistan cricket team could become number 1 in icc odi ranking)
महत्वाच्या बातम्या-
“या पराभवाचा विचार करा”, टीम इंडियाच्या अपयशानंतर आली दिग्गजाने दिला सल्ला
भारत पाकिस्तान सामन्याबाबत रविंद्र जडेजाचे मोठे वक्तव्य, म्हणाला आम्ही 100 टक्के