आगामी वनडे विश्वचषकासाठी वेळापत्रकाची मंगळवारी (27 जून) घोषणा करण्यात आली. भारतातील दहा शहरांमध्ये तब्बल दीड महिना ही स्पर्धा खेळली जाणार आहे. भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानने देखील या स्पर्धेतील आपला सहभाग निश्चित केला असून, ते विविध शहरांमध्ये ते आपले नऊ साखळी सामने खेळतील. यामध्ये ते एकही सामना मुंबई अथवा पुणे येथे खेळणार नाहीत. विशेष म्हणजे सेमी फायनलमध्ये प्रवेश केला तरी ते महाराष्ट्रात खेळताना दिसणार नाहीत.
पाकिस्तान क्रिकेट संघ विविध अटींसह या विश्वचषकात खेळण्यासाठी तयार झाला आहे. पाकिस्तान भारताविरुद्धचा आपला सामना अहमदाबाद येथे खेळेल. तर कोलकाता, चेन्नई, हैदराबाद व बेंगलोर येथे प्रत्येकी दोन सामने खेळणार आहे मुंबई व पुणे येथे पाकिस्तानचा एकही सामना नियोजित केला गेला नाही. विशेष म्हणजे पाकिस्तानने उपांत्य फेरी धडक मारली आणि त्यांचा सामना मुंबई येथे जरी नियोजित असला तरी, तो सामना बदलून कोलकाता येथे खेळण्यात येईल.
पाकिस्तान 2013 पासून कोणत्याही द्विपक्षीय मालिकेसाठी भारतात येत नाही. महाराष्ट्रात शिवसेना या राजकीय पक्षाने यापूर्वी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी खोदल्याची घटना घडली आहे. तसेच पाकिस्तानने भारतात खेळू नये अशी या पक्षाची भूमिका राहिलीये. त्यामुळे सुरक्षेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये याकरता आयसीसी व बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. सुरुवातीला हा सामना चेन्नई येथे खेळ व्हावा अशी पाकिस्तानने मागणी केली होती. मात्र, त्यांची ही मागणी फेटाळून लावण्यात आली. 15 ऑक्टोबर रोजी हा सामना खेळला जाईल.
(Pakistan Cricket Team Not Playing Any Match Of 2023 ODI World Cup In Maharashtra Due To Security Reason)
महत्वाच्या बातम्या-
कोल्हापूरला पछाडत रत्नागिरी जेट्सची MPL फायनलमध्ये एन्ट्री! विजय पावले ठरला विजयाचा शिल्पकार
BREAKING: वर्ल्डकपचे काउंटडाऊन सुरू! वेळापत्रक झाले जाहीर, अहमदाबादमध्ये होणार उद्घाटनाचा सामना