नुकताच आशिया चषकाचा (Asia Cup) 15वा हंगाम संयुक्त अमिराती येथे खेळला गेला. ही स्पर्धा अनेक कारणानी अधिक गाजली. यावेळी अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत श्रीलंका क्रिकेट संघाने चषक उंचावत सगळ्यांना आश्चर्यचकित केले. भारताच्या विराट कोहलीने या स्पर्धेत शतक झळकावले, तर पाकिस्तान संघाचा खेळाडू मात्र त्याच्या विवादास्पद वागणुकीमुळे चर्चेत राहिला. आसिफ अली त्याचे नाव. मात्र यावेळी त्याने मैदानाबाहेर वाद निर्माण केला आहे.
पाकिस्तानचा संघ मायदेशी परतला असून विमानतळावर चाहते क्रिकेटपटूंसोबत फोटो काढण्यासाठी गर्दी करत होते. यावेळी एका चाहत्याने आसिफ अली (Asif Ali) याला सेल्फी काढण्याची मागणी केली होती. तेव्हा त्याने त्या चाहत्याचा हात झटकला आणि आसिफ पुढे गेला. एकाने हा प्रसंग कॅमेरामध्ये कैद केला असून तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये आसिफचा हात पकडून एक चाहता सेल्फीसाठी विचारणा करतो, तेव्हा आसिफ त्याचा हात झटकत पुढे चालला जातो. यावेळी आसिफच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसतो, तर तो त्या चाहत्याला काही न बोलता पुढे निघून जातो. अशावेळी तो पुन्हा हात उगारेल का अशी स्थिती निर्माण होते तर चाहता हसत बाजूला होतो. तर आसिफच्या प्रतिक्रियेवर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.
https://www.instagram.com/reel/CicBXxUpEYJ/?utm_source=ig_web_copy_link
आशिया चषकाच्या सुपर फोरमध्ये पाकिस्तानचा सामना अफगाणिस्तान विरुद्ध होता. या सामन्यादरम्यान, पाकिस्तान संघ फलंदाजी करत असताना मैदानावर अशी घटना घडली, जी सज्जनांच्या खेळाच्या पूर्णपणे विरुद्ध होती. तर पाकिस्तानला सामना जिंकण्यासाठी 8 चेंडूत 12 धावांची आवश्यकता होती, तर हातात 2 विकेट्स होत्या. यामुळे संघाच्या अपेक्षा आसिफवरच होत्या. सामन्याच्या 19व्या षटकात आसिफ अली फलंदाजी करत होता तर गोलंदाजी अफगाणिस्तानचा फरीद अहमद करत होता.
اس اینگل کی وڈیو بھی دیکھیں، نہیں معلوم ان افغان بھائیوں کو اتنی نفرت کیوں ہے؟#AFGvPAK pic.twitter.com/2aI6jUZUFN
— Nadir Baloch (@BalochNadir5) September 7, 2022
अशातच आसिफची विकेट गेली तर तो बाद झाल्यावर फरीद त्याच्यासमोर आनंदाने नाचायला लागला. यामुळे आसिफला राग आला आणि त्याने फरीदला मारण्यासाठी बॅट उगारली, पण पंच आणि अफगाणिस्तानचे खेळाडू घटनास्थळी पोहोचले आणि दोघांना वेगळे केले. अन्यथा हा सामना अन्य कारणाने लक्षात राहिला असता. हा सामना पाकिस्तानने 1 विकेटने जिंकला मात्र आसिफ आणि फरीद या दोघांना आयसीसीने शिक्षाही केली. त्यांनी या दोघांवर सामना शुल्कच्या 25 टक्के दंड ठोठावला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरुद्ध ऋतुचे ‘राज’! पहिल्या दिवशी झळकावले धडाकेबाज शतक; इंडिया ए सर्वबाद 293
धनश्री आणि चहलने लावला अफवांवर पूर्णविराम, शेअर केलेला व्हिडिओ होतोय व्हायरल
पाकिस्तानी फलंदाजाला हलगर्जीपणा पडला महागात, पाहा फ्री हिटमध्ये कशी गमावली विकेट