---Advertisement---

काय सांगता! वयाच्या २५व्या वर्षीच वैतागून ‘त्याने’ केला क्रिकेटला टाटा बाय बाय

On: शनिवार, सप्टेंबर 19, 2020 3:47 PM
---Advertisement---

मुंबई । पाकिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद इरफान जूनियरने अवघ्या 25 व्या वर्षी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे.  माध्यमातील काही वृत्तानुसार, त्याने हा निर्णय स्थानिक क्रिकेटच्या निवडीच्या धोरणामुळे घेतला आहे. वास्तविक, चांगली कामगिरी करूनही त्याला पहिल्या 11 खेळाडूंच्या संघात स्थान देण्यात आले नाही. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज इरफानच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. आगामी काळात तो क्रिकेट सोडेल आणि खेळासाठी काहीतरी वेगळं करेल, असंही त्याने सांगितले.

क्रिकेट सोडण्याच्या निर्णया नंतर मोहम्मद इरफान जूनियर म्हणाला, ‘सतत चांगली कामगिरी करूनही माझ्याकडे दुर्लक्ष केले गेले. पहिल्या 11 खेळाडूंच्या संघात मला स्थान देण्यात आले नाही. याचा मला खूप राग आहे. मी ही माहिती संघ व्यवस्थापनाला दिली आहे. मी अशा निवडकर्त्याने कंटाळलो आहे.’

मोहम्मद इरफान ज्युनियर याने असेही सांगितले की, येत्या काही दिवसांत तो क्रीडा जगात आणखी काही काम करेल. तो पुढे म्हणाला, “आता, भविष्यात या खेळासाठी स्वतंत्रपणे काम करण्याचे माझे ध्येय आहे.”

इरफानने आतापर्यंत 33 टी -20 सामन्यांत 43 विकेट्स घेतल्या आहेत, जेथे त्याची सरासरी 22.04 आहे. तो पाकिस्तान सुपर लीगमध्येही खेळला आहे.  इरफान कराची किंग्ज, लाहोर कलंदर आणि क्वेटा ग्लेडिएटर्सचा भाग राहिला आहे.

यापूर्वी सलमान बट यानेही पाकिस्तानच्या घरगुती क्रिकेटच्या निवड समितीच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.  त्यालाही राष्ट्रीय टी -20 स्पर्धेपूर्वी 11 खेळाडूंच्या संघात स्थान मिळालेले नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---