---Advertisement---

वयाच्या 24व्या वर्षीच घेतली निवृत्ती, पाकिस्तानी क्रिकेटपटूचा धक्कादायक निर्णय

On: सोमवार, मार्च 9, 2026 4:27 PM
---Advertisement---

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये पाकिस्तान संघ सुपर-८ फेरीतून स्पर्धेबाहेर झाला. त्यामुळे त्यांच्या अनेक आजी-माजी खेळाडूंनी संघाच्या कामगिरीवर आणि स्थानिक क्रिकेटवर प्रश्न निर्माण केले आहेत. या दिग्गजांचे हे म्हणणे आहे की स्थानिक क्रिकेटमध्ये स्तर घसरला आहे, ज्यामुळे खेळाडू मोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. याबद्दलेच एक उदाहरणही समोर आले आहे. ज्यामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये पॉलिटिक्स होत असल्याचे दिसते.

युवा क्रिकेटपटू शाहजैब भट्टी याने पाकिस्तान क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. २४ वर्षाच्या या खेळाडूने सोशल मीडियामार्फत त्याचा हा निर्णय सांगितला आहे. तसेच त्याने पाकिस्तानच्या स्थानिक क्रिकेट व्यवस्थेवर गंभीर आरोप केले आहेत. त्याने त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा व्यवसायिक सामना कायद-ए-आझम ट्रॉफी दरम्यान खेळला होता. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने उत्तम कामगिरी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर तो एकाही सामन्यात खेळला नाही.

शाहजेबने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “पाकिस्तान क्रिकेटला अलविदा. मी वयाच्या २४व्या वर्षी पाकिस्तान क्रिकेट सोडत आहे. गेल्या वर्षी मी कायद-ए-आझमची ट्रॉफी जिंकली आणि त्या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर झाले होते. त्यानंतर मी सलग ४० सामने बाकावरच राहिलो. माझे पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न होते, मात्र राजकारण, भ्रष्टाचार आणि पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे माझे करियर धोक्यात आले आहे. असे अनेक लोकांसोबत घडले असून आता मला चांगलेच कळून चुकले आहे की प्रत्येकजण पाकिस्तान क्रिकेट का सोडत आहे.”

शाहजेबच्या कारकिर्दीची नुकतीच सुरूवात होत होती. त्याने दोन प्रथम श्रेणी, एक टी२० आणि एक लिस्ट ए सामना खेळला. यामध्ये त्याने ७६ धावा केल्या आणि आठ विकेट्स घेतल्या. तो जानेवारी २०२५नंतर पुन्हा खेळला नाही. त्याने खेळलेल्या शेवटच्या सामन्यात सियालकोटने कायद-ए-आझम ट्रॉफी जिंकली होती. त्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ४० धावा आणि दुसऱ्या डावात नाबाद ३२ धावा केल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---