संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघ चांगल्या फॉर्ममध्ये असलेला दिसत आहे. पाकिस्तानने भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांना पराभूत करत उपांत्य फेरीसाठी आपली जागा जवळपास निश्चित केली. त्याचवेळी आता पाकिस्तानने आणखी विजय मिळविल्यास त्याचा फायदा देशातील गरजू विद्यार्थ्यांना होणार आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ब्रँड ॲम्बेसिडर असलेल्या एका कंपनीने याबाबत खुलासा केला.
गरजू विद्यार्थ्यांना देणार स्कॉलरशिप
पाकिस्तान संघाने विश्वचषक आत्तापर्यंत तीन विजय मिळवले आहेत. पाकिस्तान संघाने आणखी विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानमधील प्रसिद्ध ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म असलेल्या नून पाकिस्तान या कंपनीने प्रत्येक विजयानंतर पाकिस्तानमधील ५० गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम हा या कंपनीचा ब्रँड ॲम्बेसिडर आहे. बाबरने आपल्या ट्विटर हँडलवरून यासंबंधीची पोस्ट शेअर केली.
Happy to announce that Noon is going to give scholarships to 50 students for each match that we win. Keep supporting us and we'll keep making you proud 💚
Apply here: https://t.co/HIRMCRHdLx#Noon #BabarxNoon #T20worldcup @NoonPakistan @SayaCorps pic.twitter.com/3ccS49RDHI
— Babar Azam (@babarazam258) October 31, 2021
पाकिस्तान संघाने मिळवले तीन विजय
या विश्वचषकात विजेतेपदाचे दावेदार म्हणून उतरलेल्या पाकिस्तान संघाने आत्तापर्यंत तीन सामने खेळताना तीनही सामन्यांत विजय संपादन केला आहे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा तब्बल १० गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर न्यूझीलंड व अफगाणिस्तान विरुद्ध अटीतटीच्या झालेल्या सामन्यात आसिफ अली याने दोन शानदार खेळ्या करत संघाला विजय मिळवून दिले. पाकिस्तान या विजयामुळे ब गटामध्ये अव्वल स्थानी आहे. त्यांना आपले पुढील दोन सामने स्कॉटलंड आणि नामिबिया संघांविरुद्ध होणार आहेत. त्यामुळे पाकिस्तान या गटांमध्ये अव्वल स्थानी जाणार हे जवळपास निश्चित झाले.
महत्त्वाच्या बातम्या-
केन विलियम्सनने सांगितला आपला मास्टरप्लॅन, ‘या’ रणनितीसह भारतावर मिळवला एकतर्फी विजय
पहिल्याच चेंडूवर झेलबाद होण्यापासून वाचला रोहित, रितीकाच्या जीवात आला जीव; पाहा रिऍक्शनचा व्हिडिओ
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर बुमराह झाला व्यक्त; म्हणाला, ‘६ महिने सतत क्रिकेट, आम्हालाही…’