---Advertisement---

एबी केवळ पैशांसाठी आयपीएलमध्ये करतोय विकेटकीपिंग, पाहा कुणी केलाय ‘हा’ गंभीर आरोप

On: मंगळवार, सप्टेंबर 29, 2020 2:04 PM
---Advertisement---

आयपीएल २०२० चा दहावा सामना सोमवारी (२८ सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. या सामन्यात दोन्ही संघांनी सारख्या धावा केल्याने सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे सुपर ओव्हर खेळण्यात आली होती. बेंगलोरने हा सामना सुपर ओव्हरमध्ये आपल्या नावावर केला.

या सामन्यात बेंगलोरचा धडाकेबाज खेळाडू एबी डिविलियर्सने चमकदार कामगिरी करत २४ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. त्यात ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. दरम्यान मुंबई संघ फलंदाजीला आल्यावर बेंगलोर संघाकडून डिविलियर्स यष्टीरक्षण करत होता. त्याच्या यष्टीरक्षणाबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत.

डिविलियर्सच्या यष्टीरक्षणाबद्दल सोशल मीडियावर पाकिस्तानी चाहते आपले मत व्यक्त करत आहेत. त्यात पाकिस्तानच्या एका चाहत्याने हसणारा इमोजीचा समावेश करत म्हटले आहे की, “डिविलियर्स यष्टीरक्षण करत आहे? आयपीएलमध्ये त्याच्या समस्या दूर होतात.” म्हणजेच या ठिकाणी त्याने, डिविलियर्स केवळ पैशांसाठी आयपीएलमध्ये यष्टीरक्षण करत असल्याचे म्हटले आहे.

परंतु यावर भारतीय चाहत्याने पलटवार करत म्हटले आहे की, “डिविलियर्सने तर दक्षिण आफ्रिकेसाठीही यष्टीरक्षण केले आहे. जर त्याला पैशांची एवढीच आवश्यकता असती तर त्याने आपला यूट्यूब चॅनेल सुरू केला असता किंवा मग त्याने मॅच फिक्सिंग सारखं काही तरी केलं असतं. जसं तुमचे खेळाडू करायचे किंवा करत आहेत.”

आणखी एका भारतीय चाहत्यांनीही पलटवार करत डिविलियर्सबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

https://twitter.com/Altaf4BJP/status/1310623022693277696

तर एका भारतीय चाहत्यानेच डिविलियर्सची आकडेवारी असलेला ट्वीट शेअर केला आहे. आणि तो बेंगलोरकडून केवळ पैशांसाठी खेळत असल्याचे म्हटले आहे.

डिविलियर्सने आतापर्यंत आयपीएलमध्ये १५७ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४०.४९ च्या सरासरीने ४५३५ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ३ शतके आणि ३५ अर्धशतके ठोकली आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---