पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरनं पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आमिरनं त्याच्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. अशाप्रकारे गेल्या 24 तासांत पाकिस्तानचे दोन मोठे क्रिकेटपटू निवृत्त झाले. याआधी शुक्रवार, 13 डिसेंबर रोजी अष्टपैलू इमाद वसीमनं निवृत्ती घेतली होती.
मोहम्मद आमिरनं सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली. आमिरने लिहिलं, “खूप विचार केल्यानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा कठीण निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणं सोपं नव्हते. मला वाटतं की युवा पिढीसाठी हीच योग्य वेळ आहे. यासाठी मी पीसीबीचं आभार मानतो. मी माझं कुटुंब आणि मित्रांचं आभार मानतो.”
आमिरनं डिसेंबर 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. यानंतर त्यानं 2024 टी20 विश्वचषकापूर्वी आपला निर्णय बदलला. विश्वचषक स्पर्धेत तो पाकिस्तान संघाचा भाग होता. मात्र, त्यानंतर त्याची संघात निवड झाली नाही. आमिर आता फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहणार आहे.
32 वर्षीय मोहम्मद आमिरची कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली आहे, फिक्सिंगपासून बंदीपर्यंत त्यानं अनेक आव्हानांचा सामना केला. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमधील त्याची गोलंदाजी भारतीय चाहत्यांना कायम आठवणीत राहील. आमिरनं आपल्या कारकिर्दीत पाकिस्तानसाठी 36 कसोटी, 61 एकदिवसीय आणि 62 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं अनुक्रमे 119, 81 आणि 71 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 266 विकेट आहेत.
हेही वाचा –
2026 च्या टी20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी संघ भारतात येणार नाही, PCB ने अशी केली आपली मागणी पूर्ण
पाकिस्तानची पराभवांची मालिका सुरूच, टी20 मध्ये अशी कामगिरी करणारा दक्षिण आफ्रिका बनला तिसरा संघ
बाबर आझमने मोडला ख्रिस गेलचा मोठा विक्रम , विराट-सूर्या जवळपासही नाही