चॅम्पियन्स कपमध्ये (Champions Cup) पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैनने (Mohammad Hasnain) आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घातला. मोहम्मद हसनैनने पाकिस्तानचा स्टार सलामीवीर मोहम्मद रिझवानच्या (Mohammad Rizwan) नेतृत्वाखालील मारखोर्सविरुद्ध दुहेरी विकेट मेडन ओव्हर फेकली आणि आपल्या संघाला
शानदार सुरूवात करून दिली.
वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैनने (Mohammad Hasnain) मारखोर्सचा सलामीवीर कामरान गुलाम आणि कर्णधार रिझवानला लागोपाठच्या चेंडूंवर तंबूत पाठवले आणि षटकात एकही धाव दिली नाही. त्याने कामरान गुलामला डॉट बॉल फेकून सुरुवात केली आणि नंतर त्याला एलबीडब्ल्यू बाद केले, त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने रिझवानला बाद केले. नंतर त्याने नवीन फलंदाज सलमान आघाला एक शानदार चेंडू टाकला, पण त्याची हॅट्ट्रिक थोडक्यात हुकली. हसनैनच्या धारदार गोलंदाजीमुळे मारखोर्सचा संघ 137 धावांवरती सर्वबाद झाला.
𝟎 𝐖 𝐖 𝟎 𝟎 𝟎
A double-wicket maiden by none other than, Mohammad Hasnain! 🙌#DiscoveringChampions | #BahriaTownChampionsCup | #UMTMarkhorsvLakeCityPanthers pic.twitter.com/BYPj9JMXVx
— Bahria Town Champions Cup (@championscuppcb) September 24, 2024
मोहम्मद हसनैनने (Mohammad Hasnain) 2019 मध्ये पाकिस्तानसाठी पदार्पण केले होते. पण तो संघात स्थान निश्चित करू शकला नाही. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये त्याने पाकिस्तानसाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता आणि 2022 मध्ये शेवटचा टी20 सामना खेळला होता. हसनैनने आतापर्यंत पाकिस्तानसाठी 9 एकदिवसीय आणि 27 टी20 सामने खेळले आहेत आणि दोन्ही फॉरमॅटमध्ये त्याने एकूण 37 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
वेड्या बहिणीची वेडी ही माया! खास पोस्ट शेअर करत साराच्या अर्जुनला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी बाबर नाही, तर हा खेळाडू कर्णधार
श्रेयस अय्यरने मुंबईत खरेदी केले लक्झरी अपार्टमेंट, किंमत ऐकून पायाखालून सरकेल जमीन