पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि त्याची पत्नी अंशा यांच्या आयुष्यात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. लग्नाच्या 1 वर्षानंतर या जोडप्यानं त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत केलं.
आफ्रिदी कुटुंबीयांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना शेअर केली आहे. या जोडप्यानं आपल्या मुलाचे नाव ‘अली यार’ ठेवलं आहे. तुम्हाला कदाचित माहिती असेल, शाहीन आफ्रिदी हा पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचा जावई आहे. शाहिद पहिल्यांदाच आजोबा झाला आहे.
शाहीननं 3 फेब्रुवारी 2023 रोजी माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशाशी लग्न केलं होतं. तेव्हा त्याच्या लग्नाची पाकिस्तानसह क्रीडा विश्वात खूप चर्चा झाली होती. या दोघांचा साखरपुडा लग्नाच्या दोन वर्षांपूर्वीच झाला होता. परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लग्न होऊ शकलं नव्हतं.
शाहीन आफ्रिदी पाकिस्तानचा सर्वात महत्त्वाचा गोलंदाज आहे. तो सध्या बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत. शाहीननं पाकिस्तानसाठी आतापर्यंत 30 कसोटी, 53 एकदिवसीय आणि 70 टी-20 सामने खेळले आहेत. त्यानं कसोटीत 110 हून अधिक बळी घेतले आहेत. यासोबतच त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 104 आणि टी20 मध्ये 96 विकेट्स आहेत.
शाहीन आफ्रिदीला गेल्या वर्षी पाकिस्तानच्या टी20 संघाचा कर्णधार बनवण्यात आलं होतं. परंतु 2024 टी20 विश्वचषकापूर्वी त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आलं. त्याच्या जागी पुन्हा बाबर आझमची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची विश्वचषकातील कामगिरी खूपच खराब राहिली. त्यावेळी शाहिन आणि बाबरमध्ये सर्वकाही ठीक नसल्याच्या देखील बातम्या आल्या होत्या.
हेही वाचा –
शिखर धवनसारखा मित्र मिळणं दुर्मिळच! या 3 घटनांनी जिंकलंय चाहत्यांचं मन
शिखर धवनच्या निवृत्तीनंतर हे 3 खेळाडूही करू शकतात क्रिकेटला अलविदा
जेव्हा गब्बरनं तुटलेल्या अंगठ्यानं ऑस्ट्रेलियाला धुतलं होतं! धवनची ही खेळी चाहते कधीच विसरणार नाहीत