सध्या बांगलादेशचा पाकिस्तान दौरा सुरु आहे. या दौऱ्यावर पाकिस्तान आणि बांगलादेश दोन्ही संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना रावलपिंडी मैदानावर खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशनं 10 गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवला. तत्पूर्वी दोन्ही संघांमधील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पाकिस्तान संघामधील बातमी समोर येत आहे की, स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुसरा कसोटी सामना खेळताना दिसणार नाही.
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना देखील रावलपिंडी मैदानावर खेळला जाणार आहे. (30 ऑगस्ट) पासून दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. पाकिस्तानला चांगली कामगिरी करून सामना जिंकण्याची गरज आहे, अन्यथा त्यांना ही कसोटी मालिका गमवावी लागणार आहे. बांगलादेशनं पहिल्याच सामन्यात धमाकेदार विजय मिळवून 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
पत्रकार परिषदेत गिलेस्पीने सांगितले की, “शाहीन दुसऱ्या सामन्यातून बाहेर आहे. त्याच्याशी बोलल्यानंतरच आम्ही निर्णय घेतला आहे आणि त्याला ही गोष्ट समजली आहे. शाहीनला काही प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. तो त्याच्या गोलंदाजीसह काही गोष्टींवर काम करत आहे. अझहर महमूद त्याला मदत करत आहे जेणेकरून तो अधिक प्रभावी होईल, आम्हाला शाहीनला त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन करताना पाहायचे आहे कारण आम्हाला सर्व फॉरमॅटमध्ये भरपूर क्रिकेट खेळायचे आहे आणि त्यात शाहीन खरोखरच मोठी भूमिका बजावणार आहे.”
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तान संघ- शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), अबरार अहमद, मोहम्मद अली, सलमान अली आगा, सॅम अयुब, बाबर आझम, मीर हमजा, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), अब्दुल्ला शफीक, नसीम शाह, खुर्रम शहजाद
महत्त्वाच्या बातम्या-
वयाच्या 26व्या वर्षीच ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू निवृत्त…! कारणही धक्कादायक
काश्मीरमध्ये तब्बल 38 वर्षांनंतर क्रिकेट परतणार! धवन-कार्तिकसारखे दिग्गज दिसतील ॲक्शनमध्ये
Champion’s Trophy 2025: जय शाह ICC अध्यक्ष बनले, तरीही भारत पाकिस्तानात जाणार?