मॅच फिक्सिंग, वयाच्या कागदपत्रांशी छेडछाड, स्पॉट फिक्सिंग यांसारख्या अनेक वाईट गोष्टींचा समावेश पाकिस्तान क्रिकेटमध्ये झाला आहे. मात्र, आता पाकिस्तानच्या महान क्रिकेटपटूंमध्ये सामील असणाऱ्या माजी कर्णधाराने त्याच्या आयुष्याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. 56वर्षीय वसीम अक्रम यांनी सांगितले की, एकेकाळी त्यांना अं’मली पदार्थांचे व्यसन लागले होते. इतकेच नाही, तर कोकेनच्या व्यसनामुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या दिशेने जाऊ लागले, पण एका घटनेने त्यांना बदलून टाकले. चला काय आहे, हे प्रकरण जाणून घेऊया…
आत्मचरित्रात केला खळबळजनक खुलासा
पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रम (Wasim Akram) यांनी त्यांच्या आत्मचरित्रात खळबजनक खुलासे केले. यातील एका खुलास्यामुळे चाहत्यांसोबतच सर्व क्रिकेट प्रेमींनाही धक्का दिला. माध्यमांतील वृत्तांनुसार, अक्रम यांनी ‘सुल्तान ए मेमॉर’ या त्यांच्या आत्मचरित्रात कोकेन आणि अं’मली पदार्थांशी संबंधित व्यसनाचा खुलासा केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांना एकेकाळी अं’मली पदार्थ घेण्याची वाईट सवय लागली होती. पुस्तकात त्यांनी त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्याशी निगडीत गोष्टींचा खुलासा केला.
पहिल्यांदा इंग्लंडमध्ये घेतले कोकेन
अक्रम यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले की, त्यांनी पहिल्यांदा इंग्लंडच्या एका पार्टीत कोकेन घेतले होते. सुरुवातीला त्यांनी कोकेनची एक रेष ओढली. त्यानंतर त्यांनी दोन, तीन आणि हे कधी एक-दोन ग्रॅममध्ये बदलले कळलेच नाही. नशेच्या व्यसनात अक्रम डुंबून गेले. त्यांच्या कारकीर्दीसोबतच वैयक्तिक आयुष्यावरही याचा परिणाम होऊ लागला होता. त्यांनी म्हटले की, एकेवेळी ते अं’मली पदार्थ घेतल्याशिवाय राहू शकत नव्हते.
पत्नीच्या मृत्यूने सर्व बदलले
माध्यमांतील वृत्तांनुसार, अक्रम यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले की, “मला पार्टीत जायला आवडायचे. दक्षिण आशियाई संस्कृती अशी आहे की, तुम्ही पार्टीत ओढले जाता. एका रात्रीत तुम्ही 10-10 पार्ट्यांमध्ये हजेरी लावू शकता. या पार्ट्यांचा माझ्यावर परिणाम झाला. हुमाने शेवटचे शुद्धीत जे काही केले, ते नि:स्वार्थ होते. ती मला या नशेच्या व्यसनापासून दूर घेऊन जाऊ इच्छित होती. आयुष्यातील तो काळ संपला होता, आणि मी पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही.”
त्यांनी पुढे लिहिले की, एका घटनेने त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले. ते लिहितात, त्यांची पहिली पत्नी हुमाच्या मृत्यूने सर्वकाही बदलले. यानंतर त्यांनी निर्णय घेतला की, ते पुन्हा कधीच कोकेनचे सेवन करणार नाहीत. त्यांनी लिहिले की, “जेव्हा मी पार्ट्यांमध्ये असायचो, तेव्हा हुमा एकटी राहायची. ती इंग्लंडहून कराचीला जायचे होते, जेणेकरून या सर्वांपासून दूर आपल्या आई-वडिलांकडे राहता येईल. मात्र, मला हे नको होते.”
पाकिस्तानच्या दिग्गज गोलंदाजांमध्ये सामील
अक्रम हे निवृत्तीनंतर समालोचन करताना दिसतात. त्यांच्या नावाचा समावेश पाकिस्तानच्या महान गोलंदाजांमध्ये होतो. त्यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीमध्ये एकूण 104 कसोटी आणि 356 वनडे सामने खेळले आहे. कसोटीत त्यांनी 414 विकेट्स घेतल्या आहेत, तर वनडेत त्यांनी 502 विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 257 सामन्यात गोलंदाजी करताना 1042 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात बांगलादेशचा झिम्बाब्वेवर रोमांचक विजय, केली भारताची बरोबरी
टी20 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतच सरस! वर्ल्डकपमध्ये चकित करणारी कामगिरी, पाहा भन्नाट आकडेवारी