भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली हा सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. विराटने सातत्याने शतके झळकावल्यानंतर त्याची सर्वत्र चर्चा होताना दिसतेय. पाकिस्तानमध्ये देखील विराटच्या खराब अथवा चांगल्या फॉर्म विषयी नेहमीच चर्चा होत असते. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्याशी त्याची तुलना देखील अनेक जण करतात. मात्र, आता थेट पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने आपण विराटपेक्षा सरस असल्याचे म्हटले आहे.
विराटने बांगलादेश दौऱ्यावरील अखेरच्या वनडे सामन्यात शतक झळकावल्यानंतर श्रीलंकेविरुद्ध दोन शतके पूर्ण केली. त्याच्या वनडे शतकांचा आकडा आता 46 असा पोहोचला. एकीकडे सर्वत्र विराटचे कौतुक होत असताना पाकिस्तानचा माजी फलंदाज खुर्रम मन्सूर याने आपली वनडे आकडेवारी विराटपेक्षा चांगली असल्याचा दावा केला आहे.
मन्सूर नुकताच एका वृत्त संकेतस्थळाशी बोलत होता. त्यावेळी त्याने हा दावा केला. मन्सूर म्हणाला,
“मी विराटची आणि माझी तुलना करत नाही. कारण, वनडे क्रिकेटमध्ये जगातील जे दहा फलंदाज आहे त्यामध्ये मी पहिल्या क्रमांकावर येतो. विराट माझ्यानंतर येतो. वनडे क्रिकेटमध्ये मी प्रत्येक 5.68 सामन्यानंतर शतक ठोकले आहे. तर, त्याच्या सहाव्या सामन्यानंतर शतक पूर्ण करतो. तसेच माझी लिस्ट ए सरासरी 53 असून, ती ही विराटपेक्षा श्रेष्ठ आहे.”
काय सांगतात आकडे?
मन्सूर याने पाकिस्तानसाठी सात वनडे, तीन टी20 व 16 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याच्या नावे 1064 धावा जमा केल्या आहेत. मन्सूर ज्या आकडेवारीविषयी बोलत आहेत त्यानुसार त्याने आंतरराष्ट्रीय वनडे व लिस्ट क्रिकेटमध्ये 165 डावात 27 शतके झळकावलीत. तसेच त्याच्या नावे 53 च्या सरासरीने 7922 धावा जमा आहेत.
(Pakistan Former Cricketer Said He Is Better Than Virat Kohli In List A Cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: सूर्या बनला 2022 आयसीसी टी20 क्रिकेटर ऑफ द इयर; तीन दिग्गजांना मागे टाकत उमटवली मोहोर
BREAKING: आणखी एक आयसीसी पुरस्कार भारतात! रेणुका ठाकूर ठरली एमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर