पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर बाबर आझमने (Babar Azam) नुकताच पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदावरून राजीनामा दिला होता. पण अद्याप पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार नाही. पण बाबर आझमच्या (Babar Azam) या निर्णयाचे कौतुक होत आहे. बाबरने विचार करूनच राजीनामा देण्याचे निर्णय घेतले असावे, असे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने (Wasim Akram) म्हटले आहे.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम (Wasim Akram) एका मुलाखतीदरम्यान बोलताना म्हणाला, “बाबर आझमचा हा निर्णय योग्य आहे. त्याने नीट विचार करून हे केले असावे. राजीनामा देण्यापूर्वी त्याने त्याचे गुरू, वरिष्ठ आणि कुटुंबीयांशी चर्चा केली असेल. राजीनामा देणे एवढे सोपे नाही. आपण सर्वांनी त्याच्या यी निर्णयाचा आदर केला पाहिजे. मी बाबरच्या पाठीशी उभा आहे.”
पुढे बोलताना अक्रम म्हणाला, “बाबरने कर्णधारपद सोडले आहे. तो आता मुक्तपणे खेळू शकतो. जेव्हा जेव्हा एखाद्या खेळाडूवर कर्णधारपदाचा दबाव असतो, तेव्हा तो फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करू शकत नाही. कर्णधारपद सोडल्यानंतर बाबरच्या फलंदाजीत सुधारणा होईल. तो आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकतो. कदाचित तो पाकिस्तानला काही सामने जिंकायला नक्कीच योगदान देईल. असा माझा विश्वास आहे.”
बाबरच्या आंतरराष्ट्रीय कारकर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने पाकिस्तानसाठी आतापर्यंत 54 कसोटी, 117 एकदिवसीय आणि 123 टी20 सामने खेळले आहेत. 54 कसोटी सामन्यात त्याने 44.51च्या सरासरीने 3,962 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्याने 26 अर्धशतकांसह 9 शतके झळकावली आहेत. 117 एकदिवसीय सामन्यात त्याने 5,719 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 32 अर्धशतके, 19 शतके आहेत. टी20 मध्ये त्याने पाकिस्तानसाठी 4,125 धावा केल्या आहेत. टी20 मध्ये त्याने 36 अर्धशतकांसह 3 शतके झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs BAN; पहिल्या टी20 सामन्यासाठी कशी असणार भारताची प्लेइंग 11?
संजय मांजरेकरांची जीभ पुन्हा घसरली, महिला विश्वचषकातील कॉमेंट्रीदरम्यान वादग्रस्त वक्तव्य
विकेटही घेतल्या, शतकही ठोकलं! टीम इंडियाला मिळाला नवा अश्विन?