बाबर आजमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. पाकिस्तान संघाने तब्बल १४ वर्षानंतर पहिल्यांदाच भारतीय संघाला टी२० विश्वचषक स्पर्धेत पराभूत केले. तसेच त्यांनी एकही सामना न गमावता सलग ५ सामन्यात विजय मिळवला आहे. पाकिस्तान संघ टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला होता.
आता उपांत्य फेरीचे चित्र स्पष झाले असून पाकिस्ताननंतर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांनीही उपांत्य सामन्यासाठी तिकीट पक्के केले. आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील पहिली लढत ११ नोव्हेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे.
यूएईमध्ये पाकिस्तान संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे. २०१६ पासूनचा इतिहास पाहिला तर, पाकिस्तान संघाने यूएईमध्ये एकही सामना गमावला नाहीये. या दरम्यान त्यांनी १६ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी ८ संघांना पराभूत केले आहे. यामध्ये वेस्ट इंडिज, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, अफगानिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलॅंड या संघांचा समावेश आहे.
तसेच यूएईमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान ३ वेळेस आमने-सामने आले आहेत. या तिन्ही सामन्यात पाकिस्तान संघाने बाजी मारली आहे. तर टी -२० विश्वचषक स्पर्धेत हे दोन्ही संघ ६ वेळेस आमने सामने आले आहेत.ज्यामध्ये दोन्ही संघांनी ३-३ सामन्यात विजय मिळवला आहे.
तसेच बाबर आजमने ५ पैकी ४ सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. तसेच विश्वचषक स्पर्धेच्या एकाच हंगामात बाबर आजमने ४ वेळेस ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे.या बाबतीत भारतीय कर्णधार विराट कोहली पहिली क्रमांकावर आहे. बाबर आजम विराट कोहलीला या बाबतीत मागे टाकू शकतो.
अशी असू शकते पाकिस्तान संघाची संभावित प्लेइंग ११
मोहम्मद रिझवान (यष्टिरक्षक), बाबर आजम (कर्णधार), फखर जमान, मोहम्मद हाफीज,शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, हसन अली, हरिस रऊफ, शाहीन फरीदी
अशी असू शकते ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग ११
डेविड वॉर्नर, आरोन फिंच (कर्णधार), मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झांपा, जोश हेझलवुड
महत्त्वाच्या बाकम्या –
तब्बल २४ वर्षांनंतर पाकिस्तान दौ-यावर जाणार ऑस्ट्रेलिया; ‘या’ दिवशी होणार मालिकेला प्रारंभ
टी२० विश्वचषक २०२२ क्वालिफायरमध्ये अफ्रिकेच्या ‘या’ संघाने केले हैराण, पदार्पणात उत्कृष्ट प्रदर्शन