आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy) पाकिस्तानमध्ये खेळली जाणार आहे. पण या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास अद्याप राजी झाला नाही, हे लक्षात घेऊन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket Board) आता गुडघे टेकताना दिसत आहे. यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतासह सर्व संघांचे सामने पाकिस्तानमध्येच खेळले जातील यावर ठाम होते, कारण पाकिस्तान या स्पर्धेचे यजमान आहे. मात्र आता भारतीय संघाचा दृष्टिकोन पाहता पीसीबी यामध्य्ये बदल करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.
‘पीटीआय’ च्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) बदल करण्यास सहमती दर्शवली आहे. चॅम्पियन्स ट्राॅफी स्पर्धेतील भारताचे सामने शारजाह किंवा दुबईत खेळवले जाऊ शकतात, असे या रिपोर्ट्मध्ये सांगण्यात आले आहे. सूत्राने पीटीआयला सांगितले की, “पीसीबीला वाटते की जर भारत सरकारने पाकिस्तान दौऱ्याला मान्यता दिली नाही तर वेळापत्रकात काही बदल केले जाऊ शकतात, कारण भारत दुबई किंवा शारजाह येथे सामने खेळेल अशी शक्यता आहे.”
दुसरीकडे, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) पुढील आठवड्यापर्यंत स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी आयसीसीकडे आग्रह धरत आहे. वेळापत्रकाबद्दल, सूत्राने सांगितले की, “पीसीबीने काही महिन्यांपूर्वी पाठवलेले तात्पुरत्या वेळापत्रकाबद्दल आयसीसीशी चर्चा केली आहे आणि तेच वेळापत्रक (11 नोव्हेंबर) रोजी जाहीर करावे अशी त्यांची इच्छा आहे.”
मात्र, भारतीय संघाचे सामने खरेच हायब्रीड मॉडेल प्रकारात खेळवले जाणार की नाही? याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. यापूर्वी 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या आशिया चषकाचे यजमानपदही पाकिस्तानकडे होते, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा केला नव्हता आणि अशा परिस्थितीत भारतीय संघाने सामने श्रीलंकेत खेळवले गेले होते.
आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy) ही स्पर्धा फेब्रुवारी, मार्च दरम्यान खेळवली जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हे’ 3 विस्फोटक फलंदाज मोडू शकतात ब्रायन लाराचा 400 धावांचा विश्वविक्रम?
माजी दिग्गज क्रिकेटपटूने पृथ्वी शाॅला लिहिले प्रेरणादायी पत्र…!
IND vs SA; अशी असू शकते भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन, हे खेळाडू करणार पदार्पण?