भारत पाकिस्तान संघर्षामुळे क्रिकेटवर खूप मोठा परिणाम झालेला आहे. आयपीएल स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. तसेच पाकिस्तान सुपर लीग 2025 सुद्धा सध्या स्थगित केली आहे. तसेच या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला अजून एक मोठा झटका बसू शकतो. भारत आणि पाकिस्तान तणावादरम्यान पाकिस्तानची एक महत्त्वाची मालिका रद्द होऊ शकते.
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात पाच सामन्यांची टी20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जाणार आहे. ठरलेल्या कार्यक्रमानुसार बांगलादेश संघ 21 मे रोजी पाकिस्तानला पोहोचेल, परंतु सध्या ज्या घटना घडल्या आहेत त्यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्ड सध्या चिंतेत आहे.
बांगलादेशचे दोन खेळाडू रिशाद हुसेन आणि नाहीद राणा पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभागी झाले होते. आता पाकिस्तान सुपर लीग स्थगित केल्यामुळे हे दोन्ही खेळाडू त्यांच्या देशात परत आले आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारत पाकिस्तान तणावामुळे आधीच स्पष्ट केले होते की, पाकिस्तान सुपर लीगचे राहिलेले सामने दुबईमध्ये होतील. परंतु जेव्हा दुबई सरकारने हा प्रस्ताव रद्द केला तेव्हा पाकिस्तानच्या बाकीच्या सामन्यांवर असमंजस स्थिती बनली आहे, त्यामुळे आता त्यांना हे समजत नाही आहे की बाकीचे उरलेले सामने कुठे खेळावे.
या परिस्थितीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अडचणी वाढविल्या आहेत. तसेच क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये सुद्धा यामुळे चिंता पसरली आहे. तसेच युद्ध सध्या स्थगित करण्यात आले आहे, ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येत आहे.






