पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सोमावारी इंग्लंडने जिंकली. मालिकेतील दुसरा कसोटी सामना 9 डिसेंबर रोजी मुलतानमध्ये सुरू झाला होता, जो पाकिस्तानने 26 धावांनी जिंकला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तान संघ 4 बाद 198 धावांवर होता. त्यांना विजयासाठी शेवटच्या डावात 355 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे पाकिस्तान संघ गाठू शकला नाही.
सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने दुसऱ्या डावात पाकिस्तानला सर्वबाद करत विजय मिळवला. दुसऱ्या डावात पाकिस्तानसाठी इमाम उल हक (Imam-ul-Haq) याने सर्वाधिक 60 धावांची खेळी केली. तर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड (Mark Wood) याने सर्वात जास्त चार विकेट्स नावावर केल्या. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाला एकट्या अबरार अहमद (Abrar Ahmed) याने 7 विकेट्स मिळवून दिल्या. अहमदच्या फिरकीच्या जाळ्यात अडक्यामुळे इंग्लंड पहिल्या डावात 281 धावांवर गुंडाळला गेला.
प्रत्युत्तरात पहिल्या डावात पाकिस्तानने 202 धावा केल्या. पाकिस्तानसाठी पहिल्या डावात कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने 75, तर त्याच्या साथीने दौद शकील याने 63 धावा केल्या. सामन्यातील दुसऱ्या डावात इंग्लंडसाठी सलामीवीर बेन डकेत (Ben Duckett) याने 79 धावा केल्या, तर मध्यक्रमात हॅरी ब्रुक याने सर्वाधिक 108 धावा केल्या. दुसरीकडे पाकिस्तानसाठी पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावात देखील अबरार अहमद याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जहीत मोहम्मद याने देखील महत्वाच्या तीन विकेट्स घेतल्या.
शेवटच्या डावात पाकिस्तानला विजयासाठी 355 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र, संघ 328 धावांवर सर्वबाद झाला. शेवटच्या डावात सौद शाकील याने 94, तर इमाम उल हक याने 60 धावा केल्या. कसोटी मालिकेतील हा पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव असल्यामुळे त्यांनी मालिका देखील गमावली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतून पाकिस्तान या पराभवानंतर बाहेर पडला आहे. उभय संघातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 17 डिसेंबर रोजी कराचीमध्ये सुरू होईल. (Pakistan lost to England in the second test match)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘विराटने 200 शतकं केली तरी…’, पाकिस्तानी खेळाडूच्या वक्तव्याने माजली खळबळ
47000 प्रेक्षकांसमोर भारतीय महिला संघाचा व्हिक्टरी लॅप, व्हिडीओ पाहून प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान






