पाकिस्तान क्रिकेट संघात एकापेक्षा एक गोलंदाजांचा भरणा आहे. ऐंशी किंवा नव्वदच्या दशकात क्रिकेटमध्ये वसीम अक्रम आणि वकार युनिस यांचा दबदबा असायचा. त्यानंतर शोएब अख्तरनेही क्रिकेट गाजवले. पुढे मोहम्मद आमिर आणि मोहम्मद आसिफ यांसारख्या गोलंदाजांनी फलंदाजांना पुरता घाम फोडला होता. सध्याच्या काळात शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि मोहम्मद हसनैन यांसारखे गोलंदाज चमकत आहेत. आता यामध्ये आणखी एका गोलंदाजाचे नाव जोडले गेले आहे. ते म्हणजे, इहसानुल्लाह होय.
जबड्यावर मारला चेंडू
पाकिस्तान सुपर लीगमध्ये धमाल केल्यानंतर 20 वर्षीय इहसानुल्लाह याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत पदार्पण केले. मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला. मात्र, इहसानुल्लाह (Ihsanullah) याने घातक गोलंदाजी केली. तिसऱ्या सामन्यात त्याची खतरनाक गोलंदाजी पाहायला मिळाली.
डावाच्या 11व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद नबी बाद झाला. त्यानंतर क्रीझवर नजीबुल्लाह जादरान (Najibullah Jadran) आला. इहसानुल्लाह याने त्याला पहिलाच चेंडू ताशी 147.5 किमीच्या गतीने टाकला. यावेळी चेंडू बॅटची कड घेत थेट त्याच्या जबड्यावर जाऊन लागला. पाकिस्तान यष्टीरक्षकाने तातडीने येऊन त्याचे हेल्मेट काढले, तेव्हा तिथून रक्त येत होते.
https://twitter.com/Crickettalkss/status/1640426011853746176?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1640426011853746176%7Ctwgr%5Edd27601d139a84fe94ca2fcd993417f70dc67171%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Fcricket-news%2Fpakistan-pacer-ihsanullah-hits-najibullah-zadran-on-jaw-retired-hurt-after-bleeding%2Farticleshow%2F99049388.cms
नजीबुल्लाह रिटायर्ड हर्ट
फलंदाज नजीबुल्लाह जादरानच्या जबड्यावर चेंडू लागल्यामुळे रक्त येऊ लागले. त्यानंतर तो अस्वस्थ वाटल्यामुळे फिजिओंनी मैदानावर धाव घेतली. फिजिओंनी तपासल्यानंतर नजीबुल्लाहने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर क्रीझवर फलंदाजी करण्यासाठी करीम जनत उतरला. पहिल्याच चेंडूवर इहसानुल्लाह याने करीमला बाद केले. त्यानंतर अफगाणिस्तानने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या.
मालिकेत घेतल्या सर्वाधिक विकेट्स
इहसानुल्लाहने तीन सामन्यांच्या या टी20 मालिकेत 10.5 षटके गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने 6च्या इकॉनॉमी रेटने 6 विकेट्स घेतल्या. तो मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला. तिसऱ्या टी20 सामन्यात त्याने 4 षटकात 29 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. या सामन्यात पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेट्स गमावत 182 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाचा डाव 18.4 षटकात 116 धावांवरच संपुष्टात आला. असे असले, तरीही अफगाणिस्तानने पहिल्या दोन विजयाच्या जोरावर ही मालिका 2-1ने खिशात घातली. (Pakistan pacer ihsanullah hits najibullah zadran on jaw retired hurt after bleeding see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPLपूर्वी हॉटेल रूमचा पासवर्ड विसरला सूर्या, ‘सुपला शॉट’ म्हणताच घडलं ‘असं’ काही; विराटचीही खास कमेंट
चेपॉकमध्ये धोनीची एन्ट्री होताच फॅन्सनी दणाणून सोडलं स्टेडिअम, गगनचुंबी षटकार पाहून तुम्हीही व्हाल फिदा