आशिया चषक २०२२ पूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघावरील संकटे कमी होण्याचे नाव घेत नाहीत. प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी स्पर्धेतून बाहेर पडला असताना, पाकिस्तानचा आणखी एक वेगवान गोलंदाज आता आशिया चषकाला मुकणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी (२६ ऑगस्ट) रोजी एक निवेदन सार्वजनिक करून सांगितले की, संघाचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम ज्युनियर आशिया चषक स्पर्धेत खेळू शकणार नाही. वसीमच्या पाठीला दुखापत झाली असून त्यामुळे तो या स्पर्धेत सहभागी होणार नाही. वसीमच्या जागी पाकिस्तानी बोर्डाने अनुभवी वेगवान गोलंदाज हसन अलीचा संघात समावेश केला आहे. पाकिस्तानचा पहिला सामना २८ ऑगस्ट रोजी भारताविरुद्ध होईल.
Wasim ruled out of Asia Cup, Hasan named as replacement
Details here ⤵️https://t.co/wblUoVVGQw
— PCB Media (@TheRealPCBMedia) August 26, 2022
दोन दिवसांपूर्वी पाकिस्तान संघाच्या सराव सत्रादरम्यान वसीमला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलेले. तेव्हापासून वसीम आशिया चषक खेळणार का? याविषयी चर्चा सुरू झाली होती. पीसीबीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानच्या सराव सत्रात गोलंदाजी करताना त्याला दुखापत झाली होती. फिजीओने त्याची तपासणी केलेली. त्यानंतर एमआरआय स्कॅन केल्यानंतर त्याच्या दुखापतीची घोषणा केली गेली.
गेल्या आठवड्यात संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्यानंतर शाहीनच्या जागी युवा मोहम्मद हसनेनचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, आता हसन अलीच्या आगमनाने पाकिस्तानी गोलंदाजी विभाग काहीसा मजबूत झाला आहे. कारण, शाहीनच्या गैरहजेरीत संघात केवळ नसीम शाह, हरिस रौफ आणि मोहम्मद वसीम हे सर्व युवा वेगवान गोलंदाज शिल्लक होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आयसीसीच्या ‘१००% सुपरस्टार’ यादीत स्म्रिती मंधानाचा समावेश, इतर चौघींची नावेही घ्या जाणून
मुंबईचे क्रीडापटू मयूर व्यास यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’च्या ‘लाइफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड्स’ ने गौरव