पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनेनवर (Mohmmad Husnain) गोलंदाजी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. लाहोर येथे झालेल्या बायमेकॅनिकल चाचणीत त्याची गोलंदाजीची शैली सदोष (Mohmmad Husnain Illegal Bowling Action) असल्याचे समोर आले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही माहिती दिली. गेल्या महिन्यात सिडनी थंडर्स संघासाठी खेळताना त्याच्या गोलंदाजीच्या शैलीबाबत तक्रार करण्यात आली होती. २१ जानेवारी रोजी, लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सच्या चाचणी दरम्यान, हसनेनच्या कोपरांनी आयसीसीच्याच्या १५ डिग्री नियम ओलांडल्याचे आढळून आले. आखूड टप्प्याचे चेंडू तसेच स्लोअर टाकताना तो ही मर्यादा ओलांडल्याचे दिसून आले. हसनेन सातत्याने १४५ किलोमीटर वेगाने चेंडू टाकू शकतो. (Mohmmad Husnain Ban)
या बंदीचा अर्थ असा आहे की, हा वर्षीय गोलंदाज पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मायदेशातील मालिकेत खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलियन संघ प्रदीर्घ कालावधीनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. यासोबतच तो सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्येही खेळू शकणार नाही. कारकिर्दीच्या दृष्टीने त्याला लवकरात लवकर आपली गोलंदाजी शैली निर्दोष सिद्ध करावी लागेल.
पीसीबी करणार मदत
हसनेन याची गोलंदाजीची शैली अवैध आढळून आल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. पीसीबीने एका निवेदनात म्हटले आहे की, “पीसीबीने आपल्या गोलंदाजी तज्ञांशी या विषयावर चर्चा केली आहे. त्यानुसार, या समस्येचे निराकरण केले जाऊ शकते. पीसीबी आता एका गोलंदाजी सल्लागाराची नियुक्ती करेल जो हसनेनसोबत काम करेल. जेणेकरून तो त्याच्या गोलंदाजीची शैली सुधारू शकेल आणि पुन्हा चाचणीसाठी तयार होईल.”
बिग बॅशमध्ये करण्यात आली होती तक्रार
ऑस्ट्रेलियातील प्रमुख व्यावसायिक टी२० लीग बिग बॅशमध्ये हसनेन सिडनी थंडर्स (Mohmmad Husnain Sydney Thunders) संघाचे प्रतिनिधित्व करतो. ऍडलेड स्ट्रायकर्स विरुद्धच्या सामन्यात पंच गेरार्ड अबूड यांनी त्याच्या गोलंदाजीवर शंका उपस्थित केली होती. त्यानंतर त्याला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले होते. हसनेन आपल्यावरील बंदीविरोधात आयसीसीकडे अपील करू शकतो. कारण, अद्याप त्याच्या बंदीचा कालावधी निश्चित करण्यात आला नाही.
महत्वाच्या बातम्या-
ईसीबीचा मोठा निर्णय! ऍशेस गमावल्याने ‘त्या’ व्यक्तीची केली हकालपट्टी “मला एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळायचंय”, युवा भारतीय खेळाडूने व्यक्त केली इच्छा
विराटने कसोटी कर्णधारपद सोडल्यावर काय होती प्रतिक्रिया? शार्दुल ठाकूरचा खुलासा