---Advertisement---

रिझवान-शकीलच्या बळावर पाकिस्तानची मोठी धावसंख्या, नेदरलँड्ससमोर विजयासाठी 287 धावांचे आव्हान

On: शुक्रवार, ऑक्टोबर 6, 2023 5:45 PM
---Advertisement---

पाकिस्तान आणि नेदरलॅंड्स हे दोन्ही संघ शुक्रवारी (6 ऑक्टोबर) वनडे विश्वचषक 2023 मधील आपला पहिला सामना खेळत आहेत. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत सर्वबाद 286 धावा उभारल्या. पाकिस्तानसाठी मोहम्मद रिझवान व सौद शकील यांनी अर्धशतके झळकावली. तर, नेदरलँड्ससाठी बास डी लिडे याने सर्वाधिक चार बळी मिळवले.

उभय संघांतील या सामन्याची नाणेफेक नेदरलँड्सने जिंकली आणि पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात असून आयर्लंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये खेळपट्टीचा फायदा मिळाला. पाकिस्तानच्या पहिल्या तीन विकेट्स संघाची धावसंख्या 38 असताना गमावल्या. यात फखर झमान (Fakhar Zaman), ईमाम-उल-हक (Imam ul Haq) आणि बाबर आझम (Babar Azam) या तीन महत्वाच्या फलंदाजांचा समावेश होता. पाकिस्तानसाठी सामन्याची सुरुवात अपेक्षित पद्धतीने झाली नाही. मात्र, त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आलेल्या मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आणि सौद शकील (Saud Shakeel) यांनी संघासाठी महत्वपूर्ण भागीदारी पार पाडली.

या जोडीने चौथ्या गड्यासाठी 120 धावा जमवल्या. दोघेही प्रत्येकी 68 धावा करून बाद झाल्यानंतर, पाकिस्तानचा डाव मोहम्मद नवाजने सावरला. त्याने महत्त्वपूर्ण 43 धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तान संघ 286 पर्यंत मजल मारू शकला.

नेदरलँड संघासाठी युवा अष्टपैलू बास डी लिडे याने सर्वाधिक चार बळी टिपले. त्याला एकरमनने दोन तर आर्यन दत्त, वॅन बीक व मिकरेन यांनी प्रत्येकी एक बळी मिळवत साथ दिली.

(Pakistan Post 286 In 2023 ODI World Cup First Match Against Netherlands Rizwan Saud Shakeel Bass De Leede Shines)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---