बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना रावळपिंडीत खेळला जात आहे. रावळपिंडी कसोटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडीओनंतर पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठ्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
वास्तविक, पाकिस्तानचा उपकर्णधार सौद शकील यानं एक सोपा झेल सोडला. त्यानं हा झेल सोडल्यानंतर अंपायर रिचर्ड केटलबरोही आश्चर्यचकित झाले. या घटनेवरून पाकिस्तान क्रिकेट संघ आणि सौद शकील याला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जात आहे. खराब क्षेत्ररक्षण ही पाकिस्तानची ओळख असल्याचं चाहते सोशल मीडियावर म्हणत आहेत. यूजर्स सतत कमेंट करून या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
Pakistan Cricket Heritage pic.twitter.com/19j9XfapYr
— Danish (@PctDanish) August 31, 2024
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्ताननं 274 धावा केल्या. पाकिस्तानकडून सॅम अयुबनं सर्वाधिक 58 धावा केल्या. तर शान मसूदनं 57 धावांची खेळी केली. आघा सलमाननं 54 धावांचं योगदान दिलं. बांगलादेशकडून मेहंदी हसन मिराजनं सर्वाधिक 5 बळी घेतले. तर तस्किन अहमदला 3 विकेट मिळाल्या. याशिवाय नाहिद राणा आणि शाकिब अल हसन यांनी 1-1 विकेट घेतली.
चहापानापर्यंत बांगलादेशची धावसंख्या 8 बाद 193 धावा होती. लिटन दास 83 धावा आणि हसन महमूद 0 धावा करून क्रीजवर आहे. एकवेळ बांगलादेशचे 6 फलंदाज 26 धावांवर पॅव्हेलियनमध्ये गेले होते, मात्र त्यानंतर लिटन दास आणि मेहंदी हसन मिराज यांनी संघाचा डाव सांभाळला. मेहंदी हसन 78 धावा करून बाद झाला. त्याच्यात आणि लिटन दासमध्ये 165 धावांची भागिदारी झाली.
हेही वाचा –
‘बेझबॉल’ फक्त नावालाच! टीम इंडियाच्या ‘सिक्स हिटिंग’समोर इतर सर्व संघ फेल
5 दिग्गज क्रिकेटपटूंचे मुलं ज्यांना वडिलांप्रमाणे यश मिळालं नाही, अवघ्या काही सामन्यांमध्ये संपली कारकीर्द
अंडर-19 संघात निवड… पण राहुल द्रविडचा मुलगा समित विश्वचषकात खेळू शकणार नाही, काय आहे कारण?