पाकिस्तानने आगामी दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली असून त्यात ‘बाबर आझम’सह (Babar Azam) मोहम्मद रिझवान (Mohammed Rizwan), सॅम अयुब (Saim Ayub) आणि सलमान अली आगा (Salman Ali Agha) यांचा तिन्ही फाॅरमॅटमध्ये संघात समावेश करण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दोन्ही संघात (10 डिसेंबर ते 7 जानेवारी) या कालावधीत 3 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांचा समावेश आहे. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi), जो इंग्लंडविरूद्धचे शेवटचे 2 कसोटी सामने खेळू शकला नाही, त्याची वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत पांढऱ्या चेंडूच्या सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. तर नसीम शाहची (Naseem Shah) कसोटी आणि वनडेसाठी निवड झाली आहे.
निवड समितीचे सदस्य आणि अंतरिम पांढऱ्या चेंडूचे मुख्य प्रशिक्षक आकिब जावेद (Aaqib Javed) म्हणाले, “शाहीन शाह आफ्रिदीला कसोटी संघातून वगळणे हा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ताजा असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी एक धोरणात्मक निर्णय आहे. त्याचप्रमाणे, फखर जमानच्या नावाचा विचार करण्यात आला नाही कारण तो अद्याप फॉर्ममध्ये आला नाही आणि फिटनेस जुळत नाही.”
पुढे बोलताना आकिब जावेद म्हणाला, “इंग्लंडविरूद्ध चमकदार कामगिरी करूनही साजिद खानला बाहेर ठेवणे हा खूप कठीण आणि कठीण निर्णय होता. मात्र, सेंच्युरियन आणि केपटाऊनमधील वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही मोहम्मद अब्बासची निवड केली, जो सीम बॉलिंगचा उत्कृष्ट खेळाडू आहे.”
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी पाकिस्तानी संघ-
कसोटी- शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, हसीबुल्ला (यष्टीरक्षक), कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अब्बास, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), नसीम शाह, नोमान अली, सॅम अयुब, सलमान अली आगा
वनडे- मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टिरक्षक), अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, हारिस रौफ, कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, सॅम अयुब, सलमान अली आगा, शाहीन शाह आफ्रिदी, सुफयान मोकीम, तय्यब ताहिर, उस्मान खान (यष्टीरक्षक)
टी20- मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टिरक्षक), अबरार अहमद, बाबर आझम, हारिस रौफ, जहाँदाद खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद हसनैन, मोहम्मद इरफान खान, ओमेर बिन युसूफ, सैम अयुब, सलमान अली आगा, शाहीन शाह आफ्रिदी, सुफियान मोकीम, तय्यब ताहिर, उस्मान खान (यष्टीरक्षक)
महत्त्वाच्या बातम्या-
सारा तेंडुलकरच्या हाती मोठी जबाबदारी, लंडनमधून शिक्षण घेऊन या फाऊंडेशनची डायरेक्टर बनली
आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या फरकाने (धावांनी) विजय (टाॅप-5)
अश्लील शेरेबाजी, असभ्य कमेंट्स… टीम इंडियाच्या सराव सत्रात चाहत्यांचं गैरवर्तन!