आगामी इंग्लंड संघ पाकिस्तान दौऱ्यावर असणार आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेला (7 ऑक्टोबर) पासून सुरूवात होणार आहे. पाकिस्तान संघाला शेवटच्या कसोटी मालिकेत बांगलादेशने घरात घुसून नमवले आहे. तत्पूर्वी पाकिस्तान संघात कर्णधारपदावरून वारंवार बदल पाहायला मिळत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता पाकिस्तान इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी शान मसूदला कर्णधारपदी कायम ठेवू शकते. याशिवाय, बाबरला मर्यादित षटकांच्या फाॅरमॅटमध्ये कर्णधारपद दिलै जाऊ शकते.
शान मसूदने (Shan Masood) आतापर्यंत 5 कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले आहे. या सर्व कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने 2022-23 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता, तेव्हा इंग्लंडने बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखालील पाकिस्तानचा 3-0 ने धुव्वा उडवला होता.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान संघात फारसे बदल केले जाणार नाहीत. सूत्रांनी सांगितले की, “मर्यादित षटकांच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) यांनी चॅम्पियन्स चषक टी20 आणि एकदिवसीय स्पर्धेसाठी काही खेळाडूंची ओळख पटवली आहे, परंतु कसोटी संघाचे प्रशिक्षक जेसन गिलेस्पी आणि उच्च कामगिरी संचालक टिम नीलसन यांनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी काही खेळाडूंची निवड करण्यात स्वारस्य दाखवले नाही.”
पाकिस्तान-इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक- पहिला कसोटी सामना- 7 ते 11 ऑक्टोबर, मुल्तान, दुसरा कसोटी सामना- 15 ते 19 ऑक्टोबर, मुल्तान, तिसरा कसोटी सामना- 24 ते 28 ऑक्टोबर, रावलपिंडी
महत्त्वाच्या बातम्या-
श्रेयस अय्यरने मुंबईत खरेदी केले लक्झरी अपार्टमेंट, किंमत ऐकून पायाखालून सरकेल जमीन
प्रशिक्षक म्हणून उत्कृष्ट कोण? गंभीर की द्रविड? भारताच्या स्टार खेळाडूचा मोठा खुलासा
अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त वडील सचिन तेंडुलकरची मन जिंकणारी पोस्ट; म्हणाला, “माझ्या गुणी…”