पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत खराब सुरुवातीनंतर इंग्लंडने पुनरागमन केले आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 267 धावांपर्यंत मजल मारली होती. यानंतर आव्हानाचा बचाव करताना इंग्लंडच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या झटपट तीन विकेट घेत सामन्यात पुनरागमन केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने पहिल्या डावात तीन गडी गमावून 73 धावा केल्या. दरम्यान या सामन्यात अनोखी कामगिरी नोंदवली गेली आहे. दोन्ही संघांनी पहिल्या डावात एकाही वेगवान गोलंदाजाचा वापर केला नाही. असे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदाच झाले आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली. 29 धावा करून जॅक नोमनचा बळी ठरला. यानंतर ऑली पोप (3), जो रूट (5), हॅरी ब्रूक (5) दुहेरी आकडा गाठून पॅव्हेलियनमध्ये परतले. कर्णधार स्टोक्स 12 धावा करून बाद झाला. एका टोकाला उभा असलेला बेन डकेटही 52 धावा करून बाद झाला.
मात्र, 6 विकेट्स लवकर गेल्यानंतर जिमी स्मिथ आणि गस ऍटकिन्सन यांनी इंग्लंडचा डाव सांभाळला. जिमी स्मिथ आणि ऍटकिन्सन यांच्यात सातव्या विकेटसाठी 165 चेंडूत 105 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. दोघांनी मिळून संघाला 200 च्या पुढे नेले. जिमी स्मिथने संघाकडून सर्वाधिक धावा केल्या. 119 चेंडूंचा सामना करताना स्मिथने 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 89 धावा केल्या. तर ॲटकिन्सनने 71 चेंडूत 39 धावा केल्या.
गोलंदाजांच्या जोरावर इंग्लंडने दमदार पुनरागमन केले
पाकिस्तानकडून साजिद खानने 29.2 षटकात 128 धावा देत 6 बळी घेतले. नोमान अलीने 28 षटकांत 88 धावांत तीन बळी घेतले. जाहिदला एक विकेट मिळाली. फिरकी गोलंदाजीसमोर इंग्लंडचा डाव फिसकटला. इंग्लंडचा संघ लवकर बाद झाल्यानंतर पाहुण्या संघानेही फिरकीपटूंचा चांगलाच वापर केला. पाकिस्ताननेही लवकर विकेट गमावल्या. शफीक (14), अयुब (19) आणि कामरान गुलाम (3) लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. इंग्लंडच्या तीन गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
कसोटीच्या पहिल्या डावात ज्या सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजाने गोलंदाजी केली नाही
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, 1882
पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, 2024
कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा असे घडले
या सामन्यात एक अनोखा विक्रम पाहायला मिळाला. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी यजमान संघाने एकाही वेगवान गोलंदाजाला गोलंदाजी दिली नाही. चार फिरकीपटूंनी मिळून एकूण 68.2 षटके टाकली. यानंतर इंग्लंडनेही पहिल्या दिवशी पाकिस्तानच्या डावात एकाही वेगवान गोलंदाजाचा वापर केला नाही.
कर्णधार स्टोक्सने पाच फिरकी गोलंदाजांकडून 23 षटके गोलंदाजी करुन घेतली. कसोटी इतिहासात कोणत्याही वेगवान गोलंदाजाने कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी गोलंदाजी न करण्याची ही दुसरी वेळ आहे. 1882 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात असे दिसून आले होते.
होतो.” खेळपट्टीबाबत तो म्हणाला की, “पहिल्या दिवसापासून फिरकीला सुरुवात होईल, असे वाटतच होते. पहिल्या सत्रात चेंडू फिरला पण दुसऱ्या सत्रात खेळपट्टीने फारशी मदत केली नाही. तिसऱ्या सत्रात खेळपट्टीत काहीच उरले नव्हते.” या सामन्यात त्याला कोणत्या खेळाडूची विकेट आवडली असे विचारले असता त्याने सांगितले की, त्याच्यासाठी एक निवडणे कठीण आहे. मात्र डॅरिल मिशेलची विकेट गेमचेंजर ठरली.
महत्त्वाच्या बातम्या-
सरफराज खानने आक्रमकपणे कर्णधार रोहितला डीआरएस घेण्यासाठी मनवले आणि नंतर… Video
गंभीर-रोहितमध्ये कॉमनसेन्स नाही, माजी खेळाडूचं धक्कादायक वक्तव्य
IND vs NZ; ‘या’ स्टार खेळाडूचा जलवा पाहून गावसकरांनी फिरवले शब्द, म्हणाले…





