---Advertisement---

हाँगकाँगचा डाव पुन्हा फिस्कटला! पाकिस्तान संघानी रचलाय धावांचा डोंगर

On: शुक्रवार, सप्टेंबर 2, 2022 9:17 PM
---Advertisement---

आशिया चषक 2022मधील शेवटचा लीग सामना पाकिस्तान आणि हाँगकाँग या दोन संगांमध्ये सध्या सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत हाँगकाँग संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे हाँगकाँग संघाने भारताविरुद्धच्या सामन्यात देखील नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय दोन्ही संघ प्लेइंग 11मध्ये कोणताही बदल न करता खेळण्यासाठी उतरले होते. यावेळी पाकिस्तानी संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 2 बाद 193 धावा केल्या.

या सामन्यात पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद रिजवान याने तुफानी फलंदाजी करत 57 चेंडूत 78 धावा रचल्या. याशिवाय फकर झमान याने देखील अर्धशतकी खेळी करत पाकिस्तानसाठी धावांचा डोंगर रचला. पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम लवकर बाद झाल्यानंतर रिजवानने डाव सावरला आणि पाकिस्तान विशाल लक्ष्य रचण्यात यशस्वी ठरली. आता हाँगकाँग संघाला आशिया चषकात्या सुपर4 मध्ये धडक मारायची असल्यास 194 धावा करत या महत्वाच्या सामन्यात विजय मिळवावा लागेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाला एकाच खेळाडूत मिळाला हार्दिक आणि पोलार्ड! मुंबई इंडियन्ससोबत खास कनेक्शन
चहलच्या मागचं दु:ख काय संपना! पत्नी धनश्री रुग्णालयात घेतेय उपचार, शेअर केलाय खास फोटो
कधीच नाही लाभलं नेतृत्व करण्याचं भाग्य, पण लिजेंड्स लीगमध्ये ‘या’ दोन भारतीयांच्या वाट्याला कर्णधारपद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---