आशिया चषकाच्या सुपर 4 फेरीतील शेवटचा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन संघात खेळवला गेला. यावेळी श्रीलंकन संघाने संपूर्ण सामन्यात एकहाती वर्चस्व राखत विजय मिळवला. श्रीलंका संघाने या सामन्यात उत्तम कामगिरी करत ५ विकेट्ने पाकिस्तानी संघाचा पराभव केला.
आशिया चषक 2022चा अंतिम सामना रविवारी (11 सप्टेंबर) खेळवला जाणार आहे. त्यापूर्वीचा शेवटचा सुपर 4 सामना पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन संघात शुक्रवारी (9 सप्टेंबर) खेळवला गेला. या सामन्यात श्रीलंका संघाने एकहाती वर्चस्व राखत 5 विकेट्सने पाकिस्तानी संघाचा धुव्वा उडवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना पाकिस्तानी संघाला केवळ 121 धावा करता आल्या. त्याच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेने हे लक्ष्या 5 विकेट्स गमावत केवळ 17 षटकांत साध्य केले. यावेळी श्रीलंकेसाठी सलामीवीर पथुम निसंकाने सर्वाधिक 55 धावांची अर्धशतकी खेळी केली.
दरम्यान, रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यातदेखील श्रीलंका आणि पाकिस्तान गहे दोन संघ आमने-सामने असणार आहेत. त्यामुळे या सामन्यात श्रीलंकेने मिळवलेल्या या विजयाचा पाकिस्तानी संघावर मानसिक दबाव निर्माण करण्यास मदत होईल अशी शक्यता सध्या क्रिकेटवर्तूळात वर्तवली जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताचे दोन्ही विश्ववेजेते कर्णधार एकत्र बघतायेत ‘हा’ सामना, पाहा व्हिडिओ
‘त्याला संघात स्थान का नाही?’ शमीला बाहेर ठेवल्याने भारताचा माजी दिग्गज निवडसमितीवर भडकला
फायनलपूर्वीच्या सामन्यात पाकिस्तानवर लंकेचा दबदबा! पहिल्या डावात पाकला केवळ 121 धावा करण्यात यश






