ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतामध्ये वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. या स्पर्धेसाठीचे अधिकृत वेळापत्रक लवकरच जाहीर होईल. या विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ भारतात येणार असल्याचे त्यांनी कबूल केले होते. त्यानुसार पाकिस्तान संघाचे सामने दक्षिण भारतात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला. मात्र, आता अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याचे ठिकाण बदलण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाने सुरक्षेच्या कारणास्तव आपले सामने कोलकाता, चेन्नई, हैदराबाद व कोलकाता या शहरांमध्ये आयोजित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार वेळापत्रक असल्याचे सांगितले जाते. भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्याचे निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्याचवेळी पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याचे स्थळ बदलण्याची मागणी केली आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान व अफगाणिस्तान हा सामना नियोजित कार्यक्रमानुसार चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर खेळण्याचे निश्चित केले होते. मात्र, पीसीबीने आता हा सामना बंगलोर येथील स्टेडियमवर चिन्नास्वामी स्टेडियमवर घेण्याची मागणी केली आहे. अफगाणिस्तान संघात दर्जेदार फिरकीपटू असल्याने चेन्नई येथील खेळपट्टीवर त्यांना मदत मिळू शकते. याच गोष्टीची पाकिस्तान संघाला भीती वाटत असल्याचे सांगण्यात येते.
चेन्नई येथील खेळपट्टी पारंपारिकरित्या फिरकी गोलंदाजांना मदत करणारी आहे. अफगाणिस्तान संघात मोहम्मद नबी, राशीद खान, मुजीब रहमान व नूर अहमद असे दर्जेदार फिरकीपटू आहेत. विशेष म्हणजे हे सर्व खेळाडू भारतात आयपीएल खेळत असल्याने, येथील परिस्थितीची त्यांना चांगली जाण आहे. दुसरीकडे, पाकिस्तानच्या संघातील एकाही खेळाडूला भारतात खेळण्याचा अनुभव नाही.
(Pakistan Wants Play There Match Afghanistan At Bengaluru Chinnaswamy Stadium Instead Chepauk Stadium Chennai In 2023 ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
“तुम्ही एका रात्रीत सगळे बदलू शकत नाही”, टीम इंडियाच्या समर्थनात उतरला दिग्गज
VIDEO । ऑस्ट्रेलियाला माहागत पडली ब्रॉडची ओव्हर! लागोपाठ चेंडूवर घेतल्या महत्वाच्या विकेट्स