न्यूझीलंडमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल (आयसीसी) महिला वनडे विश्वचषक २०२२ (ICC Women ODI World Cup 2022) स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील सहावा सामना मंगळवारी (०८ मार्च) ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान (AUS vs PAK) संघात झाला. बे ओव्हल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित ५० षटकात ६ बाद १९० धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाने ३५ व्या षटकातच त्यांचे आव्हान पूर्ण केले आणि ७ विकेट्सने हा सामना खिशात घातला.
या सामन्यादरम्यान पाकिस्तानची कर्णधार (Pakistani Captain) मिस्बाह मरूफ (Misbah Maroof) हिची लहानगी मुलगी फातिमा ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या आईने अर्थात मरूफने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार अर्धशतक केल्यानंतर तिच्या मुलीसाठी विशेष सेलिब्रेशन केले आहे.
पाकिस्तानी कर्णधाराचे कोहलीसारखे बेबी सेलिब्रेशन
तर झाले असे की, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली आणि पाकिस्तानचा फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पाकिस्तानकडून सलामीवीर सिद्रा अमीन आणि नहिदा खान जास्त चांगले प्रदर्शन करू शकल्या नाहीत. संघाच्या केवळ ११ धावांवर त्या दोघींनीही आपापल्या विकेट्स गमावल्या. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत मरूफने कर्णधार खेळी केली. एका बाजूने पटापट विकेट्स जात असताना तिने डावाखेर नाबाद राहात १२२ चेंडूंमध्ये ८ चौकारांच्या मदतीने ७८ धावा केल्या.
https://www.instagram.com/reel/Ca0_aivI7dy/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान ९६ व्या चेंडूवरच तिचे अर्धशतक पूर्ण झाले होते.यंदाच्या विश्वचषकातील पहिले अर्धशतक (Misbah Maroof Half Century) पूर्ण केल्यानंतर मरूफने आनंदाने सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या तिच्या आई आणि मुलीसाठी सेलिब्रेशन केले. तिने अर्धशतकानंतर हातातील बॅट खाली ठेवत दोन्ही हात जोडून बाळाला खेळवत असल्याचे विशेष सेलिब्रेशन (Misbah Maroof Baby Celebration) केले. आयसीसीने तिच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यापूर्वी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली( Virat Kohli) ही त्याची मुलगी, वामिकासाठी असे सेलिब्रेशन करताना दिसला होता.
What a lovely moment! Cricket has boundaries on the field, but it breaks them all off the field.
Sport unites!#CWC22 pic.twitter.com/isgALYeZe1
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 6, 2022
फातिमाची झालीय भरपूर चर्चा
दरम्यान काही दिवसांपूर्वीच भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात विश्वचषक सामना झाला आहे. या सामन्यादरम्यान मरूफची मुलगी फातिमा खूप चर्चेत आली आहे. भारतीय महिला क्रिकेटपटू सामन्यादरम्यान व सामन्यानंतर फातिमासोबत वेळ घालवताना दिसल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी महिलांचा विश्वचषकात सलग दुसरा पराभव, ऑस्ट्रेलियाने ७ विकेट्सने मिळवला सोपा विजय
दीडशेपेक्षा जास्त धावा कुटल्यानंतर त्याच कसोटीत ८-९ विकेट्सही चटकावणारे अष्टपैलू, जडेजाचाही समावेश
Video: ‘बाबूजी जरा धीरे चलो’ गाण्यावर धवन-चहलची धमाल, एनसीएमधील कर्मचाऱ्यांबरोबरही मस्ती